आफ्रिकेची दणक्यात सुरुवात ((शंका)))
By admin | Published: August 18, 2015 09:37 PM2015-08-18T21:37:12+5:302015-08-18T21:37:12+5:30
रामेलाचे शतक : भारत अ संघाविरुद्ध 4 बाद 293 धावा
Next
र मेलाचे शतक : भारत अ संघाविरुद्ध 4 बाद 293 धावावायनाड : मध्यमफळीतील फलंदाज ओम्फिले रामेला याचे शतक आणि आघाडीच्या फलंदाजांचे योगदान यांच्या जोरावर दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाने भारत ‘अ’ संघाविरुद्ध पहिल्या चारदिवसीय अनधिकृत कसोटी सामन्यात दणक्यात सुरुवात केली. त्यांनी पहिल्या दिवशी 4 बाद 293 धावा केल्या होत्या. रामेला हा अखेरच्या षटकात बाद झाला. त्याने 112 धावा केल्या. सलामीवीर रीजा हेंड्रिक्सने (50) तर ताम्बे बावुमाने नाबाद 55 धावांचे योगदान दिले. रामेला आणि बावुमा यांनी चौथ्या गड्यासाठी 136 धावांची भागीदारी केली. पहिल्या दिवसअखेर बावुमासोबत दुसर्या बाजून डेन पीट शून्यावर खेळत होता. अव्वल खेळाडू वरिष्ठ संघात खेळत असल्यामुळे भारतीय अ संघाच्या गोलंदाजीचा प्रभाव कमजोर दिसून आला. फिरकीपटू अक्षर पटेल हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 52 धावांत 2 बळी घेतले. जयंत यादव आणि ईश्वर पांडे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. त्याआधी, आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हेंड्रिक्स आणि स्टियान वान जिल (28) यांनी पहिल्या गड्यासाठी 60 धावांची भागीदारी केली. जयंत यादवने वान जिलला झेलबाद केले. रायडूने हा झेल उत्कृष्टरीत्या टिपला. हेंड्रिक्सने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर मध्यमगती गोलंदाज ईश्वर पांडेच्या चेंडूवर यष्टिरक्षक अंकुशकरवी झेलबाद झाला. ((((((त्याने 87 चेंडूंत सात चौकार आणि सहा षटकार लगावले.))))) तो बाद झाला तेव्हा आफ्रिका संघ 2 बाद 100 अशा स्थितीत होता. त्यानंतर रामेला याने सर्व सूत्रे स्वीकारली. त्याने थेनिस डि ब्रुएन (38) सोबत तिसर्या गड्यासाठी 57 धावांची भागीदारी केली. 27 वर्षीय या फलंदाजाने पांडेच्या चेंडूवर षटकार ठोकत प्रथम र्शेणी क्रिकेटमधील आपले पाचवे शतक पूर्ण केले. 88 व्या षटकात पटेलच्या चेंडूवर मात्र तो बाद झाला. रामेला याने आपल्या डावात 196 चेंडूंचा सामना करीत 12 चौकार आणि 3 षटकार ठोकले. (वृत्तसंस्था)