दक्षिण आफ्रिकेकडून खेळण्याची इच्छा : पीटरसन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2016 02:10 AM2016-04-11T02:10:46+5:302016-04-11T02:10:46+5:30
आयपीएल’मध्ये पुणे रायझिंगकडून खेळणारा इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा पदार्पण करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आपण दक्षिण आफ्रिकेकडून खेळण्याचा विचार करत
मुंबई : ‘आयपीएल’मध्ये पुणे रायझिंगकडून खेळणारा इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा पदार्पण करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आपण दक्षिण आफ्रिकेकडून खेळण्याचा विचार करत असल्याचेही त्याने सांगितले. पीटरसनने २०१३-१४ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली होती. पीटरसनला इंग्लंड क्रिकेट मंडळाने संघातून डच्चू दिला होता. दक्षिण आफ्रिकेकडून खेळण्यासाठी पीटरसनला २०१८ पर्यंत वाट पहावी लागेल. इंग्लंडमध्ये २०१९ मध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत तो अन्य कोणत्याही संघाकडून खेळू शकेल. त्याचा जिवलग मित्र डॅरेन गॉफ याने त्याला तसा प्रस्ताव दिला होता. पीटरसन म्हणाला, ‘माझ्या मनात तसा विचार आहे. मात्र हे शक्य झाले तर ठीक, नाही झाले तरी काही बिघडणार नाही. मी आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप काळ क्रिकेट खेळलो आहे. मी अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेट विसरु शकलेलो नाही, असे सांगून पीटरसन म्हणाला, मला दक्षिण आफ्रिकेकडून खेळण्यासाठी अर्ज करण्यासाठी अजून एक वर्ष वाट पहावी लागणार आहे.’ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०१२ मध्ये झालेल्या मालिकेवेळी पीटरसनने ग्रॅहम स्मिथला अॅँड्र्यू स्ट्रॉसविषयी अश्लील मेसेज पाठविला होता. तेव्हापासून पीटरसनच्या करिअरला उतरती लागली. (वृत्तसंस्था)