दक्षिण आफ्रिकेचा शानदार विजय

By admin | Published: January 18, 2015 12:08 AM2015-01-18T00:08:20+5:302015-01-18T00:08:20+5:30

भेदक मारा या बळावर दक्षिण आफ्रिकेने पावसाचा अडथळा आलेल्या पहिल्या वन-डे सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार वेस्ट इंडिजला ६१ धावांनी धूळ चारली़

South Africa's Superb Victory | दक्षिण आफ्रिकेचा शानदार विजय

दक्षिण आफ्रिकेचा शानदार विजय

Next

डरबन : एबी डिव्हिलियर्स (६६), हाशिम आमला (८१), डेव्हिड मिलर (७०) यांची शानदार अर्धशतके आणि डेल स्टेन, वर्नोन फिलँडर, इम्रान ताहीर (प्रत्येकी ३ बळी) यांचा भेदक मारा या बळावर दक्षिण आफ्रिकेने पावसाचा अडथळा आलेल्या पहिल्या वन-डे सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार वेस्ट इंडिजला ६१ धावांनी धूळ चारली़
दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ४८़२ षटकांत ८ बाद २७९ धावा केल्या होत्या़ तेव्हा पावसामुळे सामना रोखण्यात आला़ यानंतर विंडीजसमोर विजयासाठी ३२ षटकांत २२५ धावांचे कठीण आव्हान ठेवले़
प्रत्युत्तरात ख्रिस गेलने आपल्या स्फोटक शैलीत फलंदाजी करताना पहिल्या विकेटसाठी ६ षटकांत ५१ धावांची भागीदारी रचली़ त्याने अवघ्या २४ चेंडूंत ५ चौकार आणि २ षटकारांसह ४१ धावांची आक्रमक खेळी केली़ तो डेल स्टेनच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक एबी डिव्हिलियर्सकडे झेल देऊन बाद झाला़
यानंतर आफ्रिकेच्या वर्नोन फिलँडरने पुढच्याच षटकात लियॉन जॉन्सनला तंबूचा रस्ता दाखविला़ यानंतर मात्र विंडीज संघाचे गडी नियमित अंतराने बाद होत गेले़ अखेर हा संघ २८़२ षटकांत १६४ धावांत गारद झाला़ डिव्हिलियर्स या सामन्याचा मानकरी ठरला़
त्याआधी हाशिम आमला, डिव्हिलियर्स आणि मिलर यांच्या अर्धशतकांच्या बळावर १़५ षटकांचा खेळ शिल्लक असताना ८ बाद २७९ धावांपर्यंत मजल मारली़
दक्षिण आफ्रिकेने पहिले २ बळी लवकरच गमावले़ यानंतर डिव्हिलियर्सने आमलासह तिसऱ्या गड्यासाठी ९९ आणि मिलरसोबत चौथ्या गड्यासाठी १२३ धावांची भागीदारी करताना संघाला संकटातून बाहेर काढले़ ५४ धावा पूर्ण करताच आमलाने १०४ सामन्यांत ५ हजार धावांचा पल्ला पूर्ण केला.
मिलरने वेगाने धावा बनविताना ६८ चेंडूंत ७० धावांची खेळी साकारली़ तो बाद झाल्यानंतर मात्र आफ्रिकेची धावसंख्या मंदावली़ त्यांना अखेरच्या ९़१ षटकांत ४१ धावाच करता आल्या़ त्यांनी चार गडीही गमावले़ वेस्ट इंडिजकडून जेरोम टेलर आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले़ (वृत्तसंस्था)

च्दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज हाशिम आमलाने वन-डे क्रिकेटमध्ये सर्वांत वेगाने ५ हजार धावा पूर्ण करण्याचा व्हिवियन रिचर्डस् आणि विराट कोहली यांचा विक्रम मागे टाकला आहे़
च्३१वर्षीय आमलाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वन-डेत ६६ धावांची शानदार खेळी केली़ त्याने ५४वी धाव घेत हा पराक्रम आपल्या नावे केला़ त्याने १०१व्या डावात हा पल्ला पूर्ण केला.
च्रिचर्डस्ने १२६ सामन्यांतील ११४ डावांत, तर विराटने १२० सामन्यांतील ११४ डावांत ५ हजार धावांचा पल्ला गाठण्याची किमया साधली होती़ मात्र आता कमी डावांत वन-डेत ५ हजार धावांचा पल्ला पूर्ण करण्याचा विक्रम आमलाने आपल्या नावे केला आहे़

Web Title: South Africa's Superb Victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.