स्पेनचा भारतावर विजय
By admin | Published: September 18, 2016 05:31 AM2016-09-18T05:31:44+5:302016-09-18T05:31:44+5:30
डेव्हिस कपच्या एकेरीच्या सामन्यात पराभव पत्करल्यानंतर, दुसऱ्या दिवशी भारताने दुहेरी सामन्यातही भारताला स्पेनकडून पराभवाचा सामना करावा लागला.
नवी दिल्ली : डेव्हिस कपच्या एकेरीच्या सामन्यात पराभव पत्करल्यानंतर, दुसऱ्या दिवशी भारताने दुहेरी सामन्यातही भारताला स्पेनकडून पराभवाचा सामना करावा लागला. स्टार खेळाडू राफेल नदाल आणि दुहेरीतील पदकविजेता मार्क लोपेज् यांनी भारताचा दिग्गज खेळाडू लिएंडर पेस आणि साकेत मिनेनी यांनी ४-६, ७-६, (७-२), ६-४, ६-४ असे पराभूत केले.
दुखपतीनंतर कोर्टवर मार्क लोपेज्च्या साथीने उतरलेल्या नदालला पेस-मिनेनी यांनी चांगलाच धक्का दिला. पहिला सेट भारताने ६-४ असा जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये स्पेनच्या जोडीने सावध खेळ केला. पेसच्या सर्व्हिसने दुसऱ्या सेटमध्ये भारताला ५ -३ अशी आघाडी मिळवून दिली असतानाही नदाल-लोपेज्ने भारतीय जोडीची एकाग्रता भंग केली आणि सलग गुण घेत सामना टायब्रेकमध्ये पोहोचवला. हा सेट लोपेज् - नदालने टायब्रेकरमध्ये पेस - मिनेनीला टायब्रेकरमध्ये सुरुवातीलाच सलग चार गुण घेत धक्का दिला आणि सेट आपल्या नावे केला.
त्यानंतर भारताच्या जोडीची एकाग्रता भंगली. त्याचा फायदा घेत नदाल आणि लोपेज्ने गुण मिळवले. तिसऱ्या सेटमध्ये स्पेनच्या जोडीने भारतावर सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले. पेसची सर्व्हिस मोडून काढत ३-१ अशी आघाडी मिळवून घेतली, तर अखेर राफेल नदालने आपली सर्व्हिस राखत संघाला तिसरा सेट ६ -४ असा जिंकून दिला. चौथ्या सेटमध्ये एकेरीत २०३ मानांकित असणाऱ्या मिनेनीने नदालची सर्व्हिस ब्रेक करत भारताला ३ -० अशी आघाडी घेऊन दिली. मात्र हीच लय भारतीय जोडी कायम राखू शकली नाही. नदाल - लोपेज्ने सहा गुणांची कमाई करत चौथ्या सेटमध्ये ६-४ असा विजय मिळवला.
सामन्यानंतर बोलताना नदाल म्हणाला, ‘‘हा सामना खरोखरीच कठीण होता. लिएंडर पेस हा एक महान खेळाडू आहे.’’(वृत्तसंस्था)