स्पेनच्या ३७ वर्षीय अॅथलेटिक्सने जिंकले पहिले सुवर्ण
By admin | Published: August 21, 2016 08:36 PM2016-08-21T20:36:53+5:302016-08-21T20:36:53+5:30
उंच उडीमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला़ स्पेनचे आॅलिम्पिकमध्ये हे पहिले महिला अॅथलेटिक्समधील सुवर्णपदक आहे़
ऑनलाइन लोकमत
रियो डि जेनेरिओ, दि. 21 - ३७ वर्षीय रुथ बिटियाने या महिला अॅथलिट्सने रिओ आॅलिम्पिकमध्ये उंच उडीमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला़ स्पेनचे आॅलिम्पिकमध्ये हे पहिले महिला अॅथलेटिक्समधील सुवर्णपदक आहे़ रुथने उंच उडीमध्ये वयाच्या ३७ व्या वर्षी सुवर्ण पदक जिंकले असून, तिची ही वैयक्तिक उपलब्धी आहे़ तीनवेळची युरोपियन चॅम्पियन स्पॅनिश खेळाडूने १़८८ मी़,१़९३ मी़ आणि १़९७ मी़चे मार्क आपल्या पहिल्या प्रयत्नाच पार केले़ ती या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारी सर्वात वयोवृद्ध खेळाडू बनली आहे़ रुथ म्हणाली, मी खूप खूष आहे़ लंडननंतर मी पुन्हा एकदा खेळण्याबाबत विचार केलेला नव्हता़ माझे स्वप्न साकारले़ बुल्गारियाच्या मिरेला डेमिरेवाने रौप्य आणि माजी विश्व चॅम्पियन ३२ वर्षीय क्रोएशियाच्या ब्लांका ब्लासिकने कांस्यपदक पटकावले़