एसपीजी टेनिस: भावेश नवलु-मनोज मांगेला जोडी अजिंक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 04:50 PM2019-03-04T16:50:17+5:302019-03-04T16:52:03+5:30

भावेश नवलु व मनोज मांगेला जोडीने आशिष प्रजापती व संदीप मोरे जोडीचा ६-३ असा चुरशीचा पराभव केला

SPG Tennis: Bhavesh Navalu-Manoj Mangela won title | एसपीजी टेनिस: भावेश नवलु-मनोज मांगेला जोडी अजिंक्य

एसपीजी टेनिस: भावेश नवलु-मनोज मांगेला जोडी अजिंक्य

Next

मुंबई : भावेश नवलु व मनोज मांगेला जोडीने आशिष प्रजापती व संदीप मोरे जोडीचा ६-३ असा चुरशीचा पराभव केला आणि टेनिसपटू-संघटक स्व. पी.एस. उर्फ दादा खानोलकर स्मृती चषक एसपीजी दुहेरी टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. भावेश व मनोज यांच्या अप्रतिम सर्व्हिससह भावेशने नेट जवळून मारलेले फटके प्रतिस्पर्ध्यांना पराभवाच्या खाईत लोटणारे ठरले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ एसआय सायबर कंपनीचे कार्यकारी संचालक संकेत खानोलकर व शिवाजी पार्क जिमखान्याचे असिस्टंट सेक्रेटरी सुनील रामचंद्रन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या स्पर्धेचे आयोजन जिमखान्यातील टेनिस कोर्टवर करण्यात आले होते.

  एसपीजी दुहेरी टेनिसची भावेश-मनोज विरुद्ध आशिष-संदीप या जोडीमधील अंतिम फेरी उत्तरार्धात विशेष रंगली. नाणेफेक जिंकून मनोज मांगेलाने पहिलीच सर्व्हिस राखत १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये  प्रतिस्पर्धी प्रमुख खेळाडू आशिष प्रजापतीची सर्व्हिस मोडीत काढतांना भावेश नवलुने सुंदर परतीचे फटके मारत निर्णायक गुण वसूल केले. पुढच्याच सर्व्हिसचा तिसरा सेट भावेशने मनोजच्या साथीने जिंकत ३-० अशी एकतर्फी आघाडी घेतली. त्यानंतर मात्र आशिष प्रजापती व संदीप मोरे जोडीने चौथ्या, सहाव्या व आठव्या सेटमध्ये विजयी पुनरागमन करूनही ३-५ अशा पिछाडीवर राहिले. त्यांना प्रतिस्पर्ध्यांची विशेषतः मनोज मांगेलाची पाचव्या सेटमधील सर्व्हिस भेदण्यात अपयश आले. त्यामुळे जोशपूर्ण खेळ करीत भावेश-मनोज जोडीने ६-३ असा विजय मिळवीत अजिंक्यपदाच्या रोख रुपये बारा हजारसह दादा खानोलकर स्मृती चषकावर शिक्कामोर्तब केला.     
   शिवाजी पार्क जिमखानातर्फे एसआय सायबर सहप्रायोजित टेनिस मार्कर व सहाय्यक प्रशिक्षक यांच्यासाठी आयोजित दुहेरी टेनिस स्पर्धेत मुंबईसह ठाणे, पालघर, सोलापूर, पुणे, औरंगाबाद, नागपूर आदी जिल्ह्यातील दुहेरीचे ६५ स्पर्धक सहभागी झाले होते. उपांत्य उपविजेतेपद समीर शेख-परमेश्वर मणी व निर्मल स्वामी-अक्षय चोरगे या जोडीने तर उपांत्यपूर्व उपविजेतेपद नीलकंठ डमरे-वेंकू धनगर, दत्ता जगदाळे-इम्रान शेख, मंगेश इनामे-अक्षय इनामे आणि उत्कृष्ट जोडी पुरस्कारासह नागेश खारवी-विजय गिरी यांनी पटकाविला.

Web Title: SPG Tennis: Bhavesh Navalu-Manoj Mangela won title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tennisटेनिस