फिरकी गोलंदाजी निर्णायक ठरेल
By admin | Published: March 17, 2016 01:24 AM2016-03-17T01:24:10+5:302016-03-17T01:24:10+5:30
आयसीसी टी-२० विश्वचषकात भारताची अत्यंत खराब सुरुवात झाली. न्यूझीलंड संघात झुंजार वृत्ती आहे, हे ध्यानात घेतले तरी धोनी अॅन्ड कंपनीकडून अशा प्रकारच्या पराभवाची अपेक्षा नव्हती.
- सौरव गांगुली लिहितो़..
आयसीसी टी-२० विश्वचषकात भारताची अत्यंत खराब सुरुवात झाली. न्यूझीलंड संघात झुंजार वृत्ती आहे, हे ध्यानात घेतले तरी धोनी अॅन्ड कंपनीकडून अशा प्रकारच्या पराभवाची अपेक्षा नव्हती. नागपूरच्या खेळपट्टीने भारताची चांगलीच ‘फिरकी’ घेतली. मीदेखील नागपुरात बरेच क्रिकेट खेळलो. या खेळपट्टीबाबत टीम इंडिया नव्हे, तर मलादेखील आश्चर्याचा धक्का बसला. खेळपट्टी टर्न घेते, पण
किती टर्न व्हावी. क्युरेटरनेदेखील
याची कल्पना केली नसावी. या खेळपट्टीवर धावांचा पाठलाग खरोखर कठीण होता.
या खेळपट्टीवरील भारताची फलंदाजी चर्चेचा विषय असेलही,
पण न्यूझीलंडलादेखील श्रेय
दिले पाहिजे. हा संघ चांगलाच खेळला व समतोल संघ
आहे. फलंदाजी फळीत कॉलीन
मुन्रो, मार्टिन गुप्टिल, कोरी
अँडरसन, रॉस टेलर केन विल्यम्सन आणि ग्रँट इलियट हे चांगल्या धावा काढू शकतात. चेंडूवर नियंत्रण मिळविणारे चांगले फिरकी गोलंदाज संघात आहेत. भारतीय उपखंडात व विश्वचषकात फिरकी महत्त्वाची भूमिका बजावेल.
न्यूझीलंडने याची झलक दिली. नाथन मॅक्युलम, ईश सोधी आणि मिशेल सेन्टनर हे स्पर्धेत प्रत्येक सामन्यात मोलाची भूमिका बजावू शकतात. न्यूझीलंडच्या निवडकर्त्यांनी हे हेरले असावे. त्यामुळे भारताविरुद्ध तिघांनाही संधी दिली. परिस्थितीचा त्यांनी चांगला वेध घेतलेला दिसतो. या बळावर भारतावर सलग पाचवा टी-२० विजय नोंदविण्यात यश आले.
विश्वचषकाची सुरुवात पराभवाने झाल्यानंतर अंतिम चार संघांत स्थान मिळविण्यासाठी भारताला आता प्रत्येक सामना जिंकण्याचे आव्हान असेल. इडन आणि मोहालीतील खेळपट्ट्यांवर मोठ्या खेळी करीत अनुभवी भारतीयांना उपांत्य फेरी गाठता येईल. पण त्यासाठी फटका मारण्यापूर्वी चेंडूचा वेध घेणे गरजेचे राहील. टी-२० ला हवी असलेली फलंदाजी विजयाचा आनंद मिळवून देते हेदेखील खरे.
(गेमप्लान)