खेळपट्टीनेच घेतली ‘फिरकी’
By Admin | Published: February 11, 2016 03:26 AM2016-02-11T03:26:54+5:302016-02-11T03:26:54+5:30
पहिल्या टी-टष्ट्वेन्टी सामन्यात तयार करण्यात आलेली खेळपट्टी फिरकी गोलंदाजांऐवजी जलदगती गोलंदाजांना अनुकूल होती. आॅस्ट्रेलियात पाहायला मिळणारी खेळपट्टी पाहून अवाक् झालो
पुणे : पहिल्या टी-टष्ट्वेन्टी सामन्यात तयार करण्यात आलेली खेळपट्टी फिरकी गोलंदाजांऐवजी जलदगती गोलंदाजांना अनुकूल होती. आॅस्ट्रेलियात पाहायला मिळणारी खेळपट्टी पाहून अवाक् झालो. खेळपट्टी फिरकीला साथ देईल, अशी आम्ही अटकळ बांधल्याचे फिरकी गोलंदाज सचित्रा सेनानायके याने सांगितले.
मंगळवारी गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय मैदानावर झालेल्या सामन्यात श्रीलंकेने भारताला
नमवून १-०ने आघाडी घेतली आहे. याविषयी सेनानायके म्हणाला, ‘‘पुण्याची खेळपट्टी
आॅस्ट्रेलियातील खेळपट्टीसारखी उसळी घेणारी होती. अशा
खेळपट्टीची आम्ही कल्पनादेखील केली नव्हती.
आमच्या युवा खेळाडूंनी आॅस्ट्रेलियासारख्या तगड्या संघाला गारद करणाऱ्या संघावर विजय मिळविला आहे. आमच्या संघात जवळपास एकही वरिष्ठ खेळाडू नसतानाही विजय मिळविल्याने खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावला आहे.’’
बऱ्याच कालावधीपासून आम्ही अशा पद्धतीच्या खेळपट्टीवर खेळलो नव्हतो. यानिमित्ताने आगामी विश्वचषक स्पर्धेपूर्वी संघाची फलंदाजी पारखण्याची संधी मिळाली. अनेकदा पहिल्या काही क्रमांकांवरील फलंदाजांनी खेळल्यास इतरांना संधी मिळत नाही. आता आम्हाला टी-टष्ट्वेन्टी प्रकारात स्वत:ला सामावून घ्यावे लागेल, असे भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी म्हणाला. (वृत्तसंस्था)
टी-टष्ट्वेन्टी प्रकारात १०१ धावांत संपूर्ण संघ बाद होण्याची शक्यता कमी असते. या प्रकारात २ चेंडूंत १० धावा वसूल करणाऱ्यास चांगली खेळी म्हणतात. भारताने या सामन्यात केवळ ७२ धावांत ८ गडी गमावले. हा क्रीडाप्रकार वेगळा असून, त्याला एकदिवसीय सामन्याप्रमाणे घेऊन चालणार नाही. त्या प्रकारात तुम्हाला स्वत:ला सामावून घ्यावे लागेल.
- महेंद्रसिंह धोनी, भारतीय संघाचा कर्णधार
भारतीय संघावरील विजयाचे श्रेय गोलंदाजांना जाते. आमच्या युवा संघाने चांगली कामगिरी केली. त्यांनी वरिष्ठ खेळाडूंची कमतरता जाणवू दिली नाही. मालिकेची विजयी सुरुवात करणे संघाचा उत्साह वाढविणारे आहे.
- दिनेश चंडीमल, कर्णधार श्रीलंका