क्रीडा : अजलन शाह चषक
By Admin | Published: March 25, 2015 09:10 PM2015-03-25T21:10:02+5:302015-03-25T21:10:02+5:30
सतबीर, चिंग्लेनसाना, मनदीप सिंहला संधी
स बीर, चिंग्लेनसाना, मनदीप सिंहला संधी सरदारकडे कर्णधारपद कायम : अजलन शाह चषकासाठी भारतीय हॉकी संघ जाहीर नवी दिल्ली : मलेशियातील इपोह येथे १२ एप्रिलपासून सुरू होणार्या अजलन शाह चषक हॉकी स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघ जाहीर करण्यात आला आहे़ या संघात चिंग्लेनसाना सिंह, सतबीर सिंह आणि मनदीप सिंह यांचा समावेश करण्यात आला आहे़ स्पर्धेसाठी जाहीर झालेल्या १८ सदस्यीय संघातून मिडफिल्डर दानिश मुस्तबा, स्ट्राईकर ललित उपाध्याय आणि डिफेंडर गुरजिंदर सिंह यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे़ संघाच्या कर्णधारपदी सरदार सिंहला कायम ठेवण्यात आले आहे, तर उपकर्णधाराची जबाबदारी पी़आऱ श्रीजेश निभावणार आहे़संघात श्रीजेश आणि हरज्योत सिंह यांच्या रूपात दोन गोलकिपर असतील़ जर गुरबाज सिंह, रपिंदर पाल सिंह, वीरेंद्र लाकडा, कोथाजित सिंह आणि व्ही़ आऱ रघुनाथ डिफेन्सची जबाबदारी स्वीकारतील़ मिडफिल्डमध्ये सरदार, मनप्रीत सिंह, धरमवीर सिंह, चिंग्लेनसाना आणि एस़ के़ उथप्पा, तर फॉरवर्डलाईनमध्ये रमनदीप सिंह, एस़व्ही. सुनील, आकाशदीप सिंह, निकीन थिमैया, सतबीर आणि मनदीप जबाबदारी पार पाडतील़ संघाचे नवीन प्रशिक्षक पॉल वॉन यांच्या मार्गदर्शनाखाली ही पहिलीच स्पर्धा असेल़ वॉन म्हणाले, या स्पर्धेत आम्ही सकारात्मक सुरुवात करण्यासाठी इच्छुक आहोत़ या स्पर्धेसाठी खेळाडूंनी विशेष मेहनत घेतली आहे़ याच बळावर संघ उत्कृष्ट कामगिरी करील अशी आशा आहे़ या स्पर्धेत भारताव्यतिरिक्त मलेशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कोरिया आणि कॅनडा या संघांचा समावेश आहे़ स्पर्धेत भारताचा पहिला सामना ५ एप्रिल रोजी कोरियाशी होणार आहे़ त्यानंतर ६ एप्रिलला न्यूझीलंड, मलेशिया विरुद्ध ८ एप्रिल, कॅनडाविरुद्ध ९ एप्रिल आणि ११ एप्रिल रोजी भारताला ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार आहे़स्पर्धेसाठी जाहीर संघ : गोलकिपर : पी.आर. श्रीजेश , हरज्योत सिंह, डिफेंडर : गुरबाज सिंह, रुपिंदर पाल सिंह, वीरेंद्र लाकडा, कोथाजीत सिंह, व्ही. आर. रघुनाथ, मिडफिल्डर : मनप्रीत सिंह, सरदार सिंह, धरमवीर सिंह, चिंग्लेनसाना सिंह, एस़के. उथप्पा, फॉरवर्ड : रमनदीप सिंह, एस़व्ही. सुनील, आकाशदीप सिंह, निकिन थिमैया, सतबीर सिंह, मनदीप सिंह़