क्रीडामंत्र्यांनाच कळेना खेळाडूंच्या फोटो आणि नावातील फरक !
By admin | Published: August 15, 2016 07:57 PM2016-08-15T19:57:41+5:302016-08-15T21:56:36+5:30
विजय गोयल यांनी एथलेटिक्समध्ये 200 मीटर महिला शर्यतीच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्बानी नंदा हिला शुभेच्छा देण्यासाठी केलेल्या टिवटमध्ये चक्क दुती चंद हिचा फोटो लावून तो टि्वटवर शेअर केला
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - राजकारणी आणि बॉलिवूडकरांनी खेळाडूंच्या नावाची वाट लावणं काही नवीन नाही. गेल्या काही दिवसांपूर्वीच सलमान खानला भारताची पहिली महिला जिम्नॅस्टिक दीपा कर्माकर हिचं नावच आठवत नव्हतं. त्यावेळी त्यानं दीपाचं नाव चुकीच्या पद्धतीनं उच्चारलं होतं. तेव्हाही त्याचावर टीका झाली होती. मात्र सलमानच्याच पावलावर पाऊल ठेवून ही घोडचूक चक्क केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी केली आहे.

विजय गोयल यांनी एथलेटिक्समध्ये 200 मीटर महिला शर्यतीच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्बानी नंदा हिला शुभेच्छा देण्यासाठी केलेल्या टि्वटमध्ये चक्क दुती चंद हिचा फोटो लावून तो टि्वटरवर शेअर केला होता. त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली. मात्र चूक लक्षात येताच त्यांनी ते फोटो असलेलं टि्वट चक्क टि्वटरवरून काढून टाकलं.
या प्रकारामुळे विजय गोयल यांनी स्वतःच्या अकलेचे तारे टि्वटरच्या माध्यमातून तोडल्याची तीव्र प्रतिक्रिया टि्वटरकरांमध्ये उमटली आहे. ही चूक विजय गोयल यांनी पहिल्यांदाच केली नाही. याआधी त्यांनी दीपा कर्माकर हिच्या नावाचा दीपा करमानकर असा उल्लेख केला होता. त्यावेळी त्यांच्यावर खूप टीका झाली होती.