क्रीडा लवादाने पर्यायच ठेवला नाही

By admin | Published: August 22, 2016 04:51 AM2016-08-22T04:51:54+5:302016-08-22T04:51:54+5:30

आमच्याकडे त्याचा पर्याय आणण्यासाठी पुरेसा वेळही मिळू शकला नाही, असे नरसिंग यादव प्रकरणात ब्रिजभूषण यांनी रविवारी सांगितले.

The sports arbitrator did not make any choice | क्रीडा लवादाने पर्यायच ठेवला नाही

क्रीडा लवादाने पर्यायच ठेवला नाही

Next


रिओ : क्रीडा लवादाने नोटीस इतक्या कमी वेळ दिली की, नरसिंग आपला युक्तिवाद करू शकला नाही आणि आमच्याकडे त्याचा पर्याय आणण्यासाठी पुरेसा वेळही मिळू शकला नाही, असे नरसिंग यादव प्रकरणात ब्रिजभूषण यांनी रविवारी सांगितले.
ब्रिजभूषण यांनी नरसिंगवर लावलेल्या चार वर्षांच्या बंदीनंतर त्याच्याविरुद्ध रचलेल्या कटकारस्थानाची सीबीआयतर्फे चौकशी करण्याची मागणी केली आहे.
ब्रिजभूषण यांनी नरसिंगवर लावलेल्या बंदीस जागतिक उत्तेजकद्रव्य सेवनविरोधी संघटनेतर्फे (वाडा) उशिरा मिळालेल्या नोटीसला जबाबदार ठरवले आहे आणि त्याचबरोबर नरसिंगला लढतीच्या काही तासआधी होणारी सुनावणी ही संशयास्पद असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. क्रीडा लवादाने दिलेल्या कठोर निर्णयावरही त्यांनी आक्षेप नोंदवला आहे.
कुस्ती संघटनेच्या अध्यक्षांनी आपल्या निवेदनात
पूर्ण घटनाक्रमाची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘गेल्या
चार महिन्यांपासून रिओ आॅलिम्पिकमध्ये ७४ किलो फ्री स्टाईल वजन गटात प्रतिनिधित्व करण्याचा वादाला १९ आॅगस्टला पूर्णविराम मिळाला. त्यात नरसिंगवर अखेर आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाने चार वर्षांची बंदी लादली आणि देशाचे आणखी एक पदक हिसकावून घेतले.’’

Web Title: The sports arbitrator did not make any choice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.