क्रीडा : बॉयकॉट

By admin | Published: September 1, 2014 09:34 PM2014-09-01T21:34:05+5:302014-09-01T21:34:05+5:30

कुक, बेल, रुटला वन-डे टीमध्ये घेऊ नये

Sports: Boycott | क्रीडा : बॉयकॉट

क्रीडा : बॉयकॉट

Next
क, बेल, रुटला वन-डे टीमध्ये घेऊ नये
लंडन : कर्णधार ॲलिस्टर कुक, इयान बेल आणि जो रूट यांना इंग्लंडच्या एकदिवसीय संघात स्थान देऊ नये, असे मत ज्योफ्री बॉयकॉट यांनी व्यक्त केले आहे़
बॉयकॉट यांनी द टेलिग्राफमधील कॉलमध्ये म्हटले की, कुक, बेल आणि रूट कसोटी क्रिकेटमधील उत्कृष्ट खेळाडू आहेत़ मात्र, त्यांना वन-डे संघात विशेष कामगिरी करता येत नाही़ त्यामुळे त्यांची एकदिवसीय संघात निवड करू नये, तसेच इंग्लंडच्या खेळाडूंना फिरकी गोलंदाजी खेळायला अडचण येत आहे़ त्यामुळे दोन वन-डे सामन्यांमध्ये इंग्लंडला पराभवाचे तोंड पाहावे लागले, असेही त्यांनी सांगितले़
बॉयकॉट यांनी स्पष्ट केले की, इंग्लंड संघ वन-डे क्रिकेटमध्ये खराब का खेळत आहे, इंग्लंडचे खेळाडू टर्न होणार्‍या चेंडूला सामोरे जाऊ शकत नाहीत़ विशेष म्हणजे वन-डेत विश्व चॅम्पियन टीम इंडिया मजबूत टीम आहे़ या संघाविरुद्ध खेळताना इंग्लंडला विशेष कामगिरी करावी लागणार आहे़ पुढे दोन्ही वन-डे जिंकायचे असतील, तर इंग्लिश संघाला सर्वोत्कृष्ट खेळ करावा लागणार आहे़
वन-डे संघात ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन आणि बेन स्टोक्स यांच्या निवडीवरही बॉयकॉट यांनी टीका केली आहे़ ते म्हणाले, हे तिघेही एकाच गतीचे गोलंदाज आहेत़ त्यांच्या गोलंदाजीत काहीच विशेषता नाही़ मात्र, हे खेळाडू गोलंदाजीसह फलंदाजीही चांगली करतात, असे कुक याने स्पष्टीकरण दिले होते़ (वृत्तसंस्था)

Web Title: Sports: Boycott

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.