क्रीडा : क्लार्क
By Admin | Published: February 13, 2015 12:38 AM2015-02-13T00:38:29+5:302015-02-13T00:49:34+5:30
क्लार्क पहिल्या सामन्याला मुकणार
क्लार्क पहिल्या सामन्याला मुकणार
मेलबोर्न : ऑस्ट्रेलियाचा दुखापतग्रस्त कर्णधार मायकल क्लार्क वन-डे वर्ल्डकपमध्ये होणार्या पहिल्या एकदिवसीय सामन्याला मुकणार आहे, अशी माहिती संघाचा प्रशिक्षक डॅरेन लेहमन याने दिली आहे़
लेहमन वृत्तसंस्थेला म्हणाला, की क्लार्क वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध होणार्या पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही़ त्याची दुखापत लवकरच बरी होईल, अशी आशा आहे़ नक्कीच तो २१ फेब्रुवारी रोजी बांगलादेशाविरुद्ध होणार्या दुसर्या सामन्यात देशाचे प्रतिनिधित्व करील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला़
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज आणि कर्णधार क्लार्क काही दिवसांपासून स्नायूच्या दुखापतीशी झुंजत आहे़ त्याने बुधवारी संयुक्त अरब अमिराती (यूएई)विरुद्ध झालेल्या सराव सामन्यात शानदार ६४ धावांची खेळी केली होती़ त्यामुळे तो पहिल्या सामन्यात खेळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती़
मात्र, आता ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या निवडकर्त्यांनी क्लार्क पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी २१ फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली आहे़ (वृत्तसंस्था)
०००