क्रीडा कॉलम
By admin | Published: February 13, 2015 11:11 PM2015-02-13T23:11:14+5:302015-02-13T23:11:14+5:30
Next
>पाकची भिस्त आफ्रिदीच्या कामगिरीवरहर्षा भोगले कॉलमआपल्या कामगिरीची छाप सोडणार्या प्रतिभावान खेळाडूंना संधी देण्यासाठी पाक क्रिकेट ओळखले जाते. पण सध्याच्या पाकिस्तान संघात मात्र अशा खेळाडूंचा शोध घेण्यासाठी संघर्ष करावा लागेल. या संघात ना उमर गुल आहे ना जुनेद खान. त्याचसोबत सईद अजमल आणि मोहम्मद आमिर संघात नाहीत, पण ७ फूट ३ इंच उंची लाभलेला मोहम्मद इरफान प्रतिस्पर्धी फलंदाजांना अडचणीत आणण्यास सक्षम आहे. त्याची साथ देण्यासाठी वहाब रियाज आणि अन्य गोलंदाज आहेत. त्यांच्या नावावर एकूण १३४ वन-डे विकेट आहेत. विशेष बाब ही आहे, की एकट्या शाहीद आफ्रिदीच्या नावावर ३९३ वन-डे विकेटची नोंद आहे. या वेळी मला प्रथमच पाकिस्तानची गोलंदाजी कमकुवत भासत आहे. पाकची गोलंदाजी भारतीय गोलंदाजीसारखी भासत आहे. फलंदाजीची बाजू मात्र याउलट आहे. तीन युवा फलंदाजांव्यतिरिक्त दोन सीनिअर फलंदाजांमुळे पाकची फलंदाजीची बाजू मजबूत झाली आहे. यष्टिरक्षक सर्फराज अहमदने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अल्पावधीत छाप सोडली आहे. अहमद शहजाद व उमर अकमल यांच्या कामगिरीचा अंदाज वर्तविणे कठीण आहे, पण या खेळाडूंमध्ये एकट्याच्या बळावर सामना जिंकून देण्याची क्षमता आहे. मिस्बाह-उल-हक पाक संघातील सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याच्या नावावर कसोटीमध्ये सर्वांत वेगवान शतकाची नोंद आहे. ४१ व्या वर्षी मिस्बाह चांगल्या फॉर्मात आहे. याव्यतिरिक्त युनूस खानही चांगला कसोटी फलंदाज असून वन-डेमध्येही त्याचा अनुभव संघासाठी उपयुक्त ठरेल. पाकिस्तानला या स्पर्धेत छाप सोडण्यासाठी पहिल्या लढतीत चमकदार कामगिरी करावी लागेल. पाकिस्तान संघाची भिस्त शाहीद आफ्रिदीच्या कामगिरीवर अवलंबून आहे. आपल्या कामगिरीच्या जोरावर सामन्याचे चित्र बदलण्याची आफ्रिदीमध्ये क्षमता आहे. ०००००