स्पोर्ट/सर्वआवृत्ती: सुवर्ण कन्या मोनिकाने दिवस गाजविला राज्यस्तरीय शालेय (१९ वर्षाआतील) वेटलिफ्टिंग स्पर्धा
By admin | Published: December 20, 2014 10:27 PM2014-12-20T22:27:19+5:302014-12-20T22:27:19+5:30
ॲड़ नीलिमा शिंगणे
Next
ॲ ़ नीलिमा शिंगणेअकोला: गतवर्षी आसामला झालेल्या राष्ट्रीय शालेय (१९ वर्षाआतील) वेटलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून देणारी मनमाडची मोनिका कडनोर हिने राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेचा दुसरा दिवस गाजविला. शनिवारी वसंत देसाई क्रीडांगण बहूद्देशीय सभागृहात पार पडलेल्या ५३ किलो वजनगटात नाशिकचे प्रतिनिधित्व करीत मोनिकाने ५८ स्नॅच आणि ७० क्लिन ॲन्ड जर्क उचलून प्रथम स्थान मिळवून, राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात स्थान निश्चित केले. याच गटात बुलडाण्याच्या शारदा पसरटे हिने द्वितीय स्थान मिळविले. पुण्याची कोमल पवार हिने तिसरे स्थान पटकाविले. ४८ किलो वजनगटात सोलापूरच्या करुणा सोनवले हिने प्रथम, नाशिकची खुशाली गांगुर्डे हिने द्वितीय आणि नागपूरच्या तनू रंगारी हिने तिसरे स्थान मिळविले. ५८ किलो वजनगटात कोल्हापूरच्या श्रद्धा पवारने नागपूरच्या प्रगती चौरेवर मात करीत प्रथम स्थान मिळविले. ६३ किलो वजनगटात नाशिकच्या नीलम शेळके हिने पुण्याच्या तैसिम शेखला पिछाडीवर ठेवले. नागपूरच्या पायल टुले हिने तृतीय स्थान मिळविले. मुलींच्या गटातील ७५ किलो वजनगटातील फेरी सायंकाळी सुरू होती.मुलांच्या गटात झालेल्या अंतिम फेरीत ५६ किलो वजनगटात शुभम तोडकर पुणे याने प्रथम स्थान पटकाविले. कोल्हापूरचा स्वस्तिक पाटील द्वितीय ठरला. मुंबईचा किरण लोखंडे तिसरा राहिला. ६२ किलो वजनगटात क्रीडा प्रबोधिनीचा सुमित पाटील प्रथम, कोल्हापूरचा संकेत सदलगे कोल्हापूर, नाशिकचा अतुल महाजन तिसरा ठरला. ६९ किलो वजनगटात अमित बडगुले प्रथम त्याचाच संघ सहकारी समाधान बडगर द्वितीय स्थानावर राहिला. नाशिकचा निशीकांत पाटील याने तृतीय स्थान मिळविले. स्पर्धेत पहिल्या दिवशी मुलींमध्ये नाशिक तर मुलांच्या गटात कोल्हापूर विभाग संघाने आघाडी घेतली आहे.स्पर्धेत पंच म्हणून सुरेश कुंभार, प्रवीण व्यवहारे, सुशील मोहोड, संजय झोरे, बिहारीलाल दुबे, शरद काळे, धैर्यशील, पंकज बांबळे काम पाहत आहे.बॉक्सस्टार ऑफ द डेमनमाडची मोनिका संपत कडनोर इयत्ता बारावीची विद्यार्थिनी. वयाच्या दहाव्या वर्षांपासून तिनं मैत्रिणींच्या सांगण्यावरून वेटलिफ्टिंग खेळाला सुरुवात केली. घरातील वडील मंडळी सर्व कुस्तीगीर; परंतु मोनिकाने वेटलिफ्टिंग खेळातच करिअर घडविण्याचा निर्णय घेतला. मागीलवर्षी आसामला झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिल्याने, महाराष्ट्र क्रीडा क्षेत्राचं तिच्याकडे लक्ष वेधल्या गेले. राष्ट्रीय स्पर्धेत तिनं ५३ स्नॅच आणि ६५ क्लिन ॲन्ड जर्क केले. प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली ती सराव करते.फोटोकॅप्शन: मुलांच्या गटात खेळप्रदर्शन करताना वेटलिफ्टर.-२१सीटीसीएल०८, २१सीटीसीएल०९ मोनिका कडनोर-२१सीटीसीएल४१