खेलो इंडिया योजनेमुळे देशात रुजली क्रीडा संस्कृती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 06:56 AM2021-08-04T06:56:41+5:302021-08-04T06:57:22+5:30
Khelo India: भारताच्या दोन्ही हॉकी संघांना ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करताना पाहून खूप आनंद झाला. त्यामुळे हॉकी चाहत्यांच्याच नव्हे तर क्रीडा रसिकांच्या आनंदाला उधाण आले. आता पदक जिंकण्यात दोन्ही संघ यशस्वी झाल्यास हा आनंद द्विगुणित होणार आहे.
- धनराज पिल्ले
भारताच्या दोन्ही हॉकी संघांना ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करताना पाहून खूप आनंद झाला. त्यामुळे हॉकी चाहत्यांच्याच नव्हे तर क्रीडा रसिकांच्या आनंदाला उधाण आले. आता पदक जिंकण्यात दोन्ही संघ यशस्वी झाल्यास हा आनंद द्विगुणित होणार आहे.
उपांत्य फेरीत पुरुष संघ बेल्जियमकडून पराभूत झाल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संघाला पाठिंबा देत कांस्य पदकासाठी कठोर प्रयत्न करण्यास प्रोत्साहित केले. टोकियोला जाण्याच्या पूर्वसंध्येला त्यांनी खेळाडूंशी संवाद साधला तेव्हाही पदकाची चिंता करू नका, असे सांगितले. केंद्र शासनाने उपलब्ध करून दिलेल्या उत्कृष्ट सोयींमुळे खेळाडूंची तयारी शक्य झाली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात २०११-१२ खेळासाठी केवळ ६२७ कोटींचा निधी प्रस्तावित होता. सरकारने क्रीडा बजेट २०१९-२० मध्ये १९८९.३९ कोटी इतका वाढवला. ही ३०० टक्के वाढ आहे. देशातील सर्वच क्षेत्रातील क्रीडा प्रतिभांना थेट लाभ मिळावा, हा यामागील हेतू यशस्वी झाला.
खेळाडूंना सर्वोत्तम प्रशिक्षण आणि समर्थन मिळावे, भारत जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवा, प्रतिभावान खेळाडूंना अधिक संधी मिळावी, तळागळातील पातळीवर काम करण्यासाठी पर्यावरणाला प्रोत्साहन मिळावे, हे पंतप्रधानांनी निर्देश देत निश्चित केले होते. गुजरातच्या क्रीडा प्राधिकरणाचा प्रशिक्षक म्हणून मी स्वत: राज्यात क्रीडा क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर चालना मिळाल्याचे अनुभवातून सांगू शकतो. मोदी हे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी २०१० ला क्रीडा महाकुंभ सुरू केला. तेव्हापासून १० मीटर एअर रायफल ऑलिम्पियन एलावेनिल एलारिव्हनसह ३८ लाख मुलामुलींनी यात भाग घेतला.
राष्ट्रीय स्तरावर अशाच, सुव्यवस्थित कार्यक्रमासाठी ही प्रेरणा होती. खेलो इंडिया गेम्सने ती पोकळी भरून काढली. २०१८ मध्ये झालेले खेलो इंडिया गेम्स सतत चार वर्षे पार पडले. २०२० ला खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सची त्यात भर पडली.याआधी समन्वयाचा अभाव, केंद्र, राज्ये आणि इतर भागधारकांच्या एकत्रित दृष्टिकोनांमध्ये समन्वय नसल्यामुळे चांगल्या हेतू असलेल्या योजना २०१४ पर्यंत सुरू होऊ शकल्या नाहीत. याची जाणीव होताच गतिमान बदलांवर मोदींनी लक्ष केंद्रित केले.खेलो इंडिया योजना प्रतिभा ओळख, प्रशिक्षण सहाय्य आणि खेळाडूंच्या मासिक पॉकेट भत्त्यासह, लाँच पॅड म्हणून काम करते. प्रतिभा, गुणवत्तापूर्ण क्रीडा सुविधा आणि सर्व वरील क्रीडा संस्कृतीवर भरवसा ठेवण्यावर या योजनेने दीर्घकालीन लक्ष केंद्रित केले आहे.
- (धनराज पिल्ले हे भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार आहेत.)