क्रीडामंत्री गोयल यांनी केली स्टेडियमची पाहणी
By Admin | Published: May 13, 2017 02:09 AM2017-05-13T02:09:55+5:302017-05-13T02:09:55+5:30
खेळाडूंच्या मूलभूत सुविधांमध्ये असलेल्या कमतरतेची बातमी समोर आल्यानंतर केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी शुक्रवारी इंदिरा गांधी स्टेडियमचा दौरा केला.
नवी दिल्ली : खेळाडूंच्या मूलभूत सुविधांमध्ये असलेल्या कमतरतेची बातमी समोर आल्यानंतर केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी शुक्रवारी इंदिरा गांधी स्टेडियमचा दौरा केला. सध्या या स्टेडियममध्ये आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत २०हून अधिक देशाचे मल्ल खेळत आहेत.
गोयल यांनी स्टेडियममधील सुविधांची माहिती घेतली आणि यावेळी त्यांनी ‘साई’चे अधिकारी मंजूश्री एस राव यांचीही भेट घेतली. राव यांनी सांगितले की, ‘हे स्टेडियम भारतीय कुस्ती महासंघाना (डब्ल्यूएफआय) भाडे तत्वावर दिले आहे. त्यामुळे खेळाडूंना पुरेशी सुविधा मिळवून देणे ही त्यांची जबाबदारी आहे.’
यावेळी गोयल यांनी शौचालयांचीही पाहणी केली आणि त्यांनी येथे फाटलेले टीशू पेपरही उचलले. तसेच, त्यांनी मुलांच्या व मुलींच्या हॉस्टेलचीही पाहणी केल्यानंतर जिम्नॅस्टीक आणि बॉक्सिंग हॉललाही भेट दिली. (वृत्तसंस्था)