डेरवणमध्ये क्रीडा महोत्सव : मुंबईची टेबल टेनिसपटू भूमी पितळेला सुवर्णपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 05:51 PM2019-03-19T17:51:13+5:302019-03-19T17:52:14+5:30
मुंबईची १४ वर्षाखालील टेबल टेनिसपटू भूमी पितळेने बाजी मारली
डेरवण : कोकणातील डेरवण येथे श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या वतीने होणारा राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव संस्थेच्या क्रीडासंकुलात जोरात सुरु झाला आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही खो खो, कबड्डी, फुटबॉल, लंगडी, बुद्धिबळ, व्हॉलीबॉल, नेमबाजी, अॅथलेटीक्स, वॉल क्लायम्बिंग, कॅरम, टेबल टेनिस, बॅडमिनटन अशा विविध खेळांच्या स्पर्धा रंगत आहेत. राज्यभरातील विविध शाळा, कॉलेज, क्लब, संघटना यामधील ४ हजाराहून अधिक खेळाडू यात सहभागी झाले आहेत. विजेत्या खेळाडूंना एकूण १२ लाखांची पारितोषिके दिली जात आहेत. मुंबईची १४ वर्षाखालील टेबल टेनिसपटू भूमी पितळेने अनुष्का जिरांगेचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले.
राज्यातून तसेच थेट गुजरातमधूनही संघ या महोत्सवामध्ये हजेरी लावत आहेत. क्रीडा स्पर्धांबरोबरच येथील क्रीडा प्रेरणा व्यासपीठावर, दररोज एक याप्रमाणे क्रीडा विषयातील अनेक तज्ञांची व्याख्यानेही आयोजित करण्यात आली आहेत. सोमवारी झालेल्या व्याख्यानात स्क्वाड्रन लीडर संजय देशमुख यांनी तरुण खेळाडूंना, संरक्षण दलात उपलब्ध असलेल्या करियर संधी याविषयी मार्गदर्शन केले. तसेच भारतीय हवाई दलामध्ये वापरात असलेली विविध विमाने, त्यांची वैशिष्ट्ये यांची माहितीही दिली. एव्हरेस्टवीर भगवान चावले यांनी खेळाडूंशी संवाद साधला.
येत्या २० मार्चला आहारतज्ञ स्वाती भोसकी खेळाडूंच्या आहाराबाबत माहिती देणार आहेत. २१ मार्चला आंतरराष्ट्रीय टेनिसपटू, डॉ. नताशा कानविंदे डोपिंगबाबत खेळाडूंशी संवाद साधतील. तर २२ मार्चला नेतृत्व कौशल्य या विषयावर शर्मिला कानविंदे मार्गदर्शन करतील.
स्पर्धेचे निकाल
टेबल टेनिस
१४ वर्षांखालील मुले – यश पाटील (सुवर्ण), देव पाखरे (रौप्य)
मुली – भूमी पितळे (सुवर्ण), अनुष्का जिरंगे (रौप्य)
१६ वर्षांखालील मुले – अद्वैत बोंद्रे सुवर्ण), भव्य शाह (रौप्य)
बॅडमिंनटन
१४ वर्षांखालील मुले – तेजस शिंदे (सुवर्ण), ओमकार भंडारी (रौप्य),
मुली – परिणीता मगदूम (सुवर्ण), देवांगी जाधव (रौप्य)
१६ वर्षांखालील मुले – वर्धन डोंगरे (सुवर्ण), वेदांत देसाई (रौप्य)
१८ वर्षांखालील मुले – अनुरूप भगत(सुवर्ण), अथर्व लाटे (रौप्य)
कबड्डी
१४ वर्षांखालील मुली – विजेता संघ – गगनभरारी स्पोर्ट्स, कोल्हापूर
उपविजेता संघ – निलेश्वर स्पोर्ट्स, कऱ्हाड
उत्कृष्ट चढाई – धनश्री तेली, गगनभरारी स्पोर्ट्स
उत्कृष्ट पकड – साक्षी पवार, निलेश्वर स्पोर्ट्स
१४ वर्षांखालील मुले – विजेता संघ एके ग्रुप, रायगड
उपविजेता संघ, संस्कारधाम विद्यालय, महाड
उत्कृष्ट पकड – विशाल यादव, संस्कारधाम, महाड
उत्कृष्ट चढाई – कोशल बारटक्के, एम के, ग्रुप
१८ वर्षांखालील मुली – अंतिम विजयी – वेताळ बाबा कला क्रीडा, कोकरूड
उपविजेता संघ – राजश्री शाहू विद्यानिकेतन, शिंगणापूर
तृतीय संघ – सोहन स्टार स्पोर्ट्स, चिपळूण
उत्कृष्ट चढाई – प्रीती शिंदे, वेताळबाबा
उत्कृष्ट पकड – नेहा कुंभार, राजश्री शाहू विद्यानिकेतन
१८ वर्षांखालील मुले – अंतिम विजयी – न्यू हिंद विजय, चिपळूण
उपविजेते – युवराज स्पोर्ट्स, देवरुख
उत्कृष्ट चढाई – प्रसाद धामणे, युवराज स्पोर्ट्स, देवरुख
उत्कृष्ट पकड – भूषण मुठेकर, न्यू हिंद विजय