खेळांचा गेम - भारतीय व महाराष्ट्र आॅलिंपिक असोसिएशन मान्यता, देशात ४०, तर महाराष्ट्रात ३१ संघटना संलग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 03:43 AM2017-10-07T03:43:11+5:302017-10-07T03:43:20+5:30
सद्यस्थितीत भारतीय आॅलिंपिक असोसिएशनशी देशातील ४० संघटना संलग्न असून, महाराष्ट्र आॅलिंपिक संघटनेशी फक्त ३१ संघटना संलग्न आहेत.
नवनाथ खराडे
अहमदनगर : सद्यस्थितीत भारतीय आॅलिंपिक असोसिएशनशी देशातील ४० संघटना संलग्न असून, महाराष्ट्र आॅलिंपिक संघटनेशी फक्त ३१ संघटना संलग्न आहेत. मात्र या संघटनांच्या नावात कुठेही आॅलिंपिक, रूरल, वूमन आॅलिंपिक अशा शब्दांचा समावेश नाही. कारण त्यांना नावात आॅलिंपिक शब्दाचा वापरच करता येत नाही. अनधिकृत संघटना मात्र बिनधास्त हा शब्द वापरत धूळफेक करतात.
सद्यस्थितीत शालेय क्रीडा स्पर्धेत ४२ खेळप्रकारांचा समावेश आहे. भारतीय आॅलिंपिक संघाकडे ४० खेळांचे प्रकार आहेत. तर आॅलिंपिकमध्ये सद्यस्थितीत ५७ खेळांचा समावेश आहे. त्यामुळे अधिकृत खेळांची वर्गवारी करून सवलती व सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे. याव्यतिरिक्तचे खेळ धंद म्हणून खेळण्यास हरकत नाही.
भारतीय आॅलिंपिक असोसिएशनशी संलग्न संघटना
आर्चरी, अॅथलेटिक्स, बास्केटबॉल, बॅडमिंटन, बिलियर्ड्स अँड स्कूनर, बॉलिंग, बॉक्सिंग, सायकलिंग, घोडेस्वारी, फेन्सिंग, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, हॅण्डबॉल, हॉकी, ज्युदो, कबड्डी, कयाकिंग आणि कनोइंग, खो-खो, नेटबॉल, रोइंग, रग्बी, शूटिंग, स्क्वॅश, स्विमिंग, टेबल टेनिस, तायक्वांदो, टेनिस, ट्रायथलॉन, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, विंटर गेम्स, रेसलिंग, वुशू, नौकाविहार, गोल्फ, आईस हॉकी, आईस स्केंटिग, ल्यूज, मॉडर्न पेन्थालॉन, कराटे. या संघटनांच्या नावात असोसिएशन किंवा ‘असोसिएशन आॅफ इंडिया’ असा उल्लेख असतो. यातील ३१ संघटना महाराष्ट्र असोसिएशनशी संलग्न आहेत. या संघटनांच्या नावात असोसिएशन किंवा ‘असोसिएशन आॅफ महाराष्ट्र’ अशाच नावाचा उल्लेख आहे.
नोकरीत आरक्षण
नोकरीतही खेळाडूंना आरक्षण देण्यात येते. राज्यस्तरीय स्पर्धेतील सुवर्णपदक, कांस्यपदक व ब्राँझपदक विजेत्यास वर्ग ३ व वर्ग ४ मध्ये ५ टक्के आरक्षण असते. तर राष्ट्रीय स्तरावरील सुवर्णपदक, कांस्यपदक व ब्राँझपदक विजेत्यास वर्ग १ व वर्ग २ साठी आरक्षण मिळते. मात्र, अधिकृत संघटना किंवा क्रीडा विभाग आयोजित स्पर्धांमधल्या खेळाडूंनाच हा लाभ मिळतो.
शालेय ४२ स्पर्धा
शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये ४२ खेळांचा समावेश आहे. त्यामध्ये धनुर्विद्या, अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, टेनिस, शूटिंग, कुस्ती, वेटलिफ्टिंग, बास्केटबॉल, बुद्धिबळ, सायकलिंग, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, ज्युदो, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस, तायक्वांदो, जलतरण व डायव्हिंग, वॉटरपोलो, कबड्डी, स्क्वॅश, वुशू, तलवारबाजी, हॅण्डबॉल, खो-खो, बॉलबॅडमिंटन, कॅरम, नेटबॉल, सॉफ्टबॉल, रोलबॉल, कराटे, शूटिंगबॉल, स्केटिंग, रोलर हॉकी, क्रिकेट, किक बॉक्सिंग, मल्लखांब, योगा, डॉजबॉल, स्क्वॉय मार्शल आर्ट, थ्रोबॉल या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.
या संघटनेच्या स्पर्र्धा व शालेय क्रीडा
स्पर्धेतील राज्यस्तरीय व राष्ट्रीय
पातळीवरील खेळाडूंना सरकारकडून सवलती दिल्या जातात.
सवलतीचे २५ गुण
दहावी व बारावीच्या विद्यार्थी खेळाडूंना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्यात येतात.
हे गुण देण्यासाठी भारतीय आॅलिंपिक व महाराष्ट्र आॅलिंपिक असोसिएशनशी संलग्नता असणाºया संघटनांनी आयोजित केलेल्या स्पर्धाच ग्राह्य धरल्या जातात.
इतर संघटनांनी आयोजित केलेल्या खेळातील खेळाडूंना गुण देण्यात येत नाहीत.