क्रीडा कर्स्टन
By admin | Published: February 13, 2015 11:11 PM2015-02-13T23:11:01+5:302015-02-13T23:11:01+5:30
विश्वविजेतेपद कसे मिळवायचे याची भारताला कल्पना आहे : कर्स्टन
Next
व श्वविजेतेपद कसे मिळवायचे याची भारताला कल्पना आहे : कर्स्टननवी दिल्ली : विश्वकप स्पर्धेपूर्वी भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक ठरली असली तरी माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांच्या मते भारताला जेतेपद राखण्याची चांगली संधी आहे. विश्वविजेतेपद कसे पटकवायचे, याची भारताला चांगली कल्पना आहे, असे कर्स्टन म्हणाले.कर्स्टन यांनी सांगितले, 'भारतीय संघाच्या सध्याच्या कामगिरीमुळे चाहते निराश आहेत, पण भारताला विश्वविजेतेपद कसे पटकवायचे, याची माहिती आहे. या विश्वकप स्पर्धेचा निकाल उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम फेरीच्या सामन्यांवर अवलंबून राहणार आहे.'२००८ ते २०११ या कालावधीत भारतीय संघाचे प्रशिक्षक असलेल्या कर्स्टन यांना चार वर्षांपूर्वी भारताने विश्वविजेतेपदाचा मान मिळविल्यानंतर सुरेश रैना, युसूफ पठाण व विराट कोहली यांनी खांद्यावर उचलले होते. भारतीय संघाने परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध रविवारी खेळल्या जाणार्या लढतीबाबत सावध असावे, असे कर्स्टन यांनी म्हटले आहे.कर्स्टन म्हणाले, 'पाकिस्तान संघात प्रतिभावान खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंबाबत अधिक माहिती नाही. संघाची यादी बघितल्यानंतर हा खेळाडू कोण आहे? हा खेळाडू कसा खेळतो? याबाबत तुमच्या मनात विचार येईल. त्यामुळे पाकिस्तान संघाला कमी लेखण्याची चूक करू नये. उभय संघांसाठी ही विश्वकप स्पर्धेची पहिली लढत आहे. त्यामुळे उभय संघांवर दडपण राहील. दडपण कमी करण्यासाठी सर्वंच खेळाडू पहिल्या लढतीत विजय मिळविण्यास उत्सुक असतात.' (वृत्तसंस्था) ०००००