क्रीडा लोकल
By admin | Published: February 16, 2015 02:02 AM2015-02-16T02:02:23+5:302015-02-16T02:02:23+5:30
राजामाता जिजाऊ व बाबा हरदास संघांना जेतेपद
Next
र जामाता जिजाऊ व बाबा हरदास संघांना जेतेपदमहापौर चषक कबड्डी स्पर्धा : स्नेहल शिंदे, पवनकुमार ठरले मालिकावीरनागपूर : महिला विभागात राजमाता जिजाऊ संघ (पुणे) आणि पुरुष गटात बाबा हरदास क्लब (हरियाणा) संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत नागपूर महानगरपालिकेतर्फे रविवारी संपलेल्या महापौर चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत आपापल्या गटात जेतेपदाचा मान मिळविला. स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणारी राजमाता जिजाऊ संघाची स्नेहल शिंदे आणि पुरुष गटात बाबा हरदास क्लबचा पवनकुमार मालिकावीर पुरस्काराचे मानकरी ठरले. रा. पै. समर्थ स्टेडियममध्ये (चिटणीस पार्क) येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महिला गटातील अंतिम सामन्यात राजमाता जिजाऊ संघाने अंकिता जगताप व स्नेहल शिंदेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर दक्षिण पूर्व रेल्वेचा (कोलकाता) २६-१४ ने पराभव करीत जेतेपदाचा मान मिळविला. राजमाता जिजाऊ संघाने दोन गुणांची आघाडी घेतली होती. दक्षिण पूर्व रेल्वेच्या पिंकी रामोले व रिना पटेल यांनी संघर्षपूर्ण खेळ केला. त्याआधी, उपांत्य सामन्यात राजमाता जिजाऊ संघाने भिवानी येथील हरियाणा स्टेट संघाचा ५३-२२ ने पराभव केला. मध्यंतरापर्यंत राजमाता जिजाऊ संघाने २२-१४ अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या उपांत्य लढतीत दक्षिण पूर्व रेल्वेने एनसीपीई (नोएडा) संघाचा २४-१९ ने पराभव करीत अंतिम फेरी गाठली. मध्यंतरापर्यंत दक्षिण पूर्व रेल्वेने १०-६ अशी आघाडी घेतली होती.पुरुष गटात अंतिम लढतीत हरियाणाच्या बाबा हरदास क्लबने दक्षिण पूर्व मध्ये रेल्वेला (बिलासपूर) २६-२२ ने नमवित विजेतेपद पटकावले. प्रीतम सिंगच्या चमकदार खेळाच्या जोरावर दपूम रेल्वेने मध्यंतरापर्यंत १५-१२ अशी आघाडी घेतली होती. मध्यंतरानंतर बाबा हरदास क्लबच्या विनोदकुमार व पवनकुमारने दमदार खेळ करीत विजय खेचून आणला. त्याआधी, उपांत्यपूर्व सामन्यात बाबा हरदास क्लबने नागपूर ग्रामीण पोलीस संघाचा २३-६ ने पराभव करीत अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात दपूम रेल्वेने मुंबईच्या मध्य रेल्वेचा १९-९ ने पराभव केला. (क्रीडा प्रतिनिधी)