राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेबाबत क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड अनभिज्ञच!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 06:24 PM2018-11-26T18:24:51+5:302018-11-26T18:26:30+5:30

सरकारी पातळीवरील काम सुशेगात सुरू आहे, असे सांगितल्यावर त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. ‘क्या क्या चल रहा है... ये देख लेंगे, फिर आपको बताएंगे’ असे सांगत त्यांनी प्रश्नांना झिडकारले. 

Sports Minister Rajyavardhan Rathore unaware of the National Sports Tournament! | राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेबाबत क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड अनभिज्ञच!

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेबाबत क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड अनभिज्ञच!

Next
ठळक मुद्देकेंद्रीय क्रीडामंत्र्यांना स्पर्धेच्या तयारीबाबत माहितीच नाहीकत्राटदारांपुढे २४ तास काम करण्याचे आव्हानतांत्रिक समिती १५ डिसेंबरला गोव्यात येणार

सचिन कोरडे, (पणजी) :  मनोरंजन क्षेत्रातील महोत्सव म्हणजे इफ्फी. या इफ्फीच्या उद्घाटनास केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड नुकतेच गोव्यात आले होते. क्रीडा विभागही त्यांच्याकडेच असल्याने एका अकादमीच्या खेळाडूंशी त्यांनी वार्तालाप केला होता. या भेटीत त्यांनी अकादमीचे गुणगान गायिले. मात्र, गोव्यात पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेबाबत विचारले असता स्पर्धेच्या तयारीबाबत ते अनभिज्ञ असल्याचे लक्षात आले. 
स्पर्धेच्या आयोजनासाठी राज्य सरकारपुढे मोठे आव्हान आहे. केंद्र सरकार यासंदर्भात कितपत जागृत आहे? सरकारी पातळीवरील काम सुशेगात सुरू आहे, असे सांगितल्यावर त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. ‘क्या क्या चल रहा है... ये देख लेंगे, फिर आपको बताएंगे’ असे सांगत त्यांनी प्रश्नांना झिडकारले. 
राठोड (कर्नल) यांची गोवा भेट चित्रपट महोत्सवासाठी असली तरीही एक क्रीडापटू आणि केंद्रीय क्रीडामंत्री या नात्याने त्यांनी गोव्यात होणाºया राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाचा आढावा घेणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाबाबत उत्सुकता दाखवली नाही. पत्रकारांनी त्यांना यासंदर्भात छेडले होते. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. 
ही स्पर्धा सध्या राज्यासाठी प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. अनेक अडचणींवर मात करून राज्य सरकारने हे शिवधनुष्य पेलण्याचे ठरवले आहे. त्यामुळे राज्य सरकारला केंद्र सरकारकडून मदतीची आणि सहकार्याची अपेक्षा आहे. परंतु, सध्याचा राजकीय आणि प्रशासकीय कारभार पाहता स्पर्धेवर संकट कायम आहे. स्पर्धा सहा महिन्यांवर आली असून साधनसुविधा आणि प्रकल्पांचे काम अर्धवट स्थितीत आहे. त्यातच स्पर्धेच्या तांत्रिक समितीच्या सदस्यांनी सुद्धा कामावर नाराजी व्यक्त केली. निविदा काढण्याची प्रक्रिया सुद्धा मंदावली आहे. त्यामुळे उर्वरित वेळेत प्रकल्प पूर्ण करायचे असल्याचे कंत्राटदारांना २४ तास काम करावे लागेल. तेव्हाच स्पर्धेची तयारी पूर्ण होईल, अशी माहिती एका अधिकाºयाने दिली.
क्रीडामंत्री म्हणून पहिल्यांदाच गोवा भेट
राठोड यांची ही दुसºयांदा गोवा भेट होती. यापूर्वी सुद्धा ते इफ्फीच्या उद्घाटनास गोव्यात आले होते. मात्र, एखाद्या अकादमीच्या कार्यक्रमास क्रीडामंत्री म्हणून ते पहिल्यांदाच गोव्यात आले होते. घाई गडबडीत त्यांनी अकादमीला आपला वेळ दिला. अकादमीची स्तुती केली. खेलो इंडिया या शासकीय कार्यक्रमाबाबत ते भरभरून बालले. मात्र, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेबाबत बोलण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता. त्यामुळे पत्रकारांची नाराजी झाली. 
तांत्रिक समिती १५ डिसेंबरला गोव्यात
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या तांत्रिक समितीने शनिवारी (दि.२४) साधनसुविधा आणि प्रकल्पांचा आढावा घेतला. या आढाव्याचा अहवाल ते सादर करतील. त्यानंतर पुढील महिन्यात म्हणजे १५ किंवा १६ डिसेंबरला ही समिती पुन्हा गोव्यात दाखल होईल. पुन्हा आढावा घेण्यात येईल. स्पर्धा आयोजनात बºयाच तांत्रिक अडचणी आहेत. त्यावर ते प्रकाश टाकतील. त्यामुळे या समितीचा पुढील दौरा अत्यंत महत्त्वाचा असेल. 
राठोड यांचे सहकार्यच : बाबू आजगावकर
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची तयारी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण होईल. ही स्पर्धा यशस्वी होईल, असा माझा विश्वास आहे. स्पर्धेसाठी केंद्र सरकारकडून खूप सहकार्य मिळत आहे. राज्य सरकारकडे पैसे कमी पडत असले तरीसुद्धा केंद्र सरकारकडून ते लवकर मिळतील, असा आम्हाला विश्वास आहे. राठोड गोव्यात आले होते; मात्र राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसंदर्भात आमची बैठक झाली नाही. त्यांचा दौरा घाईघाईचा होता. त्यांच्याकडे वेळ नव्हता. परंतु, त्यांना याविषयी कल्पना आहे, असे राज्याचे क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Sports Minister Rajyavardhan Rathore unaware of the National Sports Tournament!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा