क्रीडा मंत्रालयाने एसजीएफआयची मान्यता पुन्हा रोखली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 04:27 AM2020-05-12T04:27:50+5:302020-05-12T04:28:04+5:30
पीसीआय आणि नौकानयन महासंघाला राष्टÑीय क्रीडा संहितेच्या उल्लंघनाबद्दल, तर सुशील कुमार याच्या नेतृत्वाखालील एसजीएफआयला प्रशासनातील अनियमिततेवरून दूर ठेवण्यात आले आहे.
नवी दिल्ली : क्रीडा मंत्रालयाने सोमवारी ५४ क्रीडा महासंघांना सप्टेंबरपर्यंत मान्यता प्रदान केली, मात्र भारतीय शालेय क्रीडा महासंघासह (एसजीएफआय) भारतीय पॅरालिम्पिक समिती (पीसीआय) आणि नौकानयन महासंघाची (आरएफआय) मान्यता पुन्हा गोठवली. अ.भा. कॅरम महासंघाला नव्याने मान्यता प्रदान करण्यात आली.
पीसीआय आणि नौकानयन महासंघाला राष्टÑीय क्रीडा संहितेच्या उल्लंघनाबद्दल, तर सुशील कुमार याच्या नेतृत्वाखालील एसजीएफआयला प्रशासनातील अनियमिततेवरून दूर ठेवण्यात आले आहे. क्रीडा मंत्रालयाद्वारे महासंघांना वर्षभरासाठी मान्यता दिली जाते; मात्र यंदा केवळ सप्टेंबरपर्यंतच मान्यता प्रदान करण्यात आली. आयओए अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी यावर आक्षेप घेतला. त्यांनी डिसेंबर २०२० पर्यंत मान्यता का नाही, असा प्रश्न केला; पण क्रीडा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी यावर उत्तर देण्याचे टाळले.
पेसने चाहत्यांना मागितला सल्ला
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला निरोप देण्याबाबतचा निर्णय खेळ पुन्हा सुरू झाल्यानंतर घेणार असल्याचे टेनिसपटू लिएंडर पेसने म्हटले आहे, पण त्याने २०२१ मध्ये खेळणे सुरू ठेवायचे की नाही यासाठी चाहत्यांचा सल्ला मागितला आहे.