बीसीसीआयने घेतली क्रीडा मंत्रालयाची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 04:06 AM2017-11-23T04:06:31+5:302017-11-23T04:07:36+5:30
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटूंच्या डोपिंग चाचणीप्रकरणी सध्या मोठा वाद सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांच्याशी चर्चा केली.
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटूंच्या डोपिंग चाचणीप्रकरणी सध्या मोठा वाद सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांच्याशी चर्चा केली. त्याचवेळी, पाकविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेसंबंधी सरकारचे मतही जाणून घेतले. राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्था (नाडा) भारतीय क्रिकेटपटूंची डोपिंग चाचणी करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, बीसीसीआयने ‘नाडा’ची मागणी फेटाळून लावली. जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेप्रमाणेच (वाडा) आमच्याकडे संघटना असल्याने आम्हाला ‘नाडा’अंतर्गत चाचणी करण्याची आवश्यकता नाही, असे बीसीसीआयने स्पष्ट केले होते. बीसीसीआयच्या सर्वसाधारण सभेची विशेष बैठक ९ डिसेंबरला होणार असून या सभेच्या अजेंड्यामध्ये ‘नाडा’चा विषयही जोडण्यात आला आहे. बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी आणि महाव्यवस्थापक (प्रशासन आणि खेळ विकास) प्रो. रत्नाकर शेट्टी यांनी बुधवारी राठोड यांच्या कार्यालयामध्ये सुमारे ४५ मिनिटांची चर्चा केली. या वेळी काही अन्य विषयांवरही चर्चा झाली, परंतु मुख्य विषय डोपिंग चाचणीचा होता.
बीसीसीआयच्या एका अधिकाºयाने सांगितले की, ‘आजच्या चर्चेचा मुख्य विषय ‘नाडा’ आणि ‘वाडा’ होता. राहुल जोहरी यांच्यासोबर रत्नाकर शेट्टी जाणार असल्याचे आधीच ठरले होते, कारण त्यांना बीसीसीआयच्या डोपिंग प्रक्रीयेची माहिती आहे. ’
दरम्यान, आगामी एसजीएममध्ये क्रीडा मंत्रालयाचे मत बीसीसीआय अधिकाºयांपुढे मांडण्यात येतील. तसेच, डोपिंग विरोधी मुद्याचा समावेश अजेंडामध्ये करण्यात आला आहे, अशी माहिती बीसीसीआयचे कार्यवाहक अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी दिली. (वृत्तसंस्था)