सुशीलवरील आरोप क्रीडा मंत्रालयाने फेटाळले
By admin | Published: June 30, 2017 12:49 AM2017-06-30T00:49:18+5:302017-06-30T00:49:18+5:30
आॅलिम्पिक पदकविजेता मल्ल सुशील कुमारवरील लाभाच्या पदाचा आरोप फेटाळताना केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने या स्टार खेळाडूला
नवी दिल्ली : आॅलिम्पिक पदकविजेता मल्ल सुशील कुमारवरील लाभाच्या पदाचा आरोप फेटाळताना केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने या स्टार खेळाडूला कुस्तीचा राष्ट्रीय पर्यवेक्षक नियुक्त केल्याचा बचाव केला आहे. मागच्या वर्षी रिओ आॅलिम्पिकपूर्वी डोपिंगमध्ये अडकलेला निलंबित मल्ल नरसिंग यादव याने मंत्रालयाने पत्र लिहून सुशीलच्या नियुक्तीस विरोध दर्शविला होता. क्रीडामंत्री विजय गोयल यांनी मात्र नरसिंगचे आरोप आधारहीन असल्याचे सांगितले. नरसिंगचे म्हणणे होते की, सुशील छत्रसाल आखाड्यात मल्लांना प्रशिक्षण देत असताना राष्ट्रीय पर्यवेक्षक कसा काय बनू शकतो. या पदावर असताना तो आपल्या निकटच्या खेळाडूंना लाभ पोहोचवू शकतो. (वृत्तसंस्था)