क्रीडा : मिस्बाह
By Admin | Published: February 14, 2015 11:50 PM2015-02-14T23:50:58+5:302015-02-14T23:50:58+5:30
भावनांवर नियंत्रण ठेवा -मिस्बाह
भ वनांवर नियंत्रण ठेवा -मिस्बाह एडिलेड : वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला भारताविरुद्ध आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही; मात्र यावेळी जर या संघाविरुद्ध पराभव टाळायचा असेल तर खेळाडंूनी आपल्या भावनेवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, असे मत पाकिस्तानचा कर्णधार मिस्बाह उल हकने व्यक्त केले आहे़मिस्बाह पुढे म्हणाला, भूतकाळात काय झाले याला जास्त महत्त्व न देता खेळाडूंनी प्रत्यक्ष मैदानावर आपले शंभर टक्के योगदान देणे गरजेचे आहे़ प्रत्येक खेळाडूंनी सकारात्मक खेळ केला तर या लढतीत विजयापासून आम्हाला कुणीही रोखू शकत नाही़ वर्ल्डकप आयोजकांच्या मते भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना सर्वांत जास्त बघितला जाणारा सामना ठरणार आहे़ एडिलेड येथील ओव्हल मैदानावर जवळपास ४७ हजार प्रेक्षक सामन्याचा आनंद लुटणार आहेत, तर टीव्हीवर जवळपास १ अब्ज लोक हा सामना बघण्याची शक्यता आहे़ मिस्बाह म्हणाला, खेळाडूंनी मैदानावर दबाव न घेत नैसर्गिक खेळ करावा़ या सामन्यात सईद अजमल, उमर गुल, मोहंमद हाफिज आणि जुनैद खान यांची नक्कीची उणीव भासेल; मात्र तरीही पाक संघ कमकुवत नाही, असेही पाक कर्णधार म्हणाला़ (वृत्तसंस्था)