क्रीडामंत्र्यांची विजेंदरशी चर्चा
By admin | Published: September 11, 2016 12:37 AM2016-09-11T00:37:02+5:302016-09-11T00:37:02+5:30
क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी भारतातील बॉक्सिंगला पुढे नेण्यासाठी आॅलिम्पिक कांस्यपदक विजेता विजेंदर सिंग यांची भेट घेतली
नवी दिल्ली : क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी भारतातील बॉक्सिंगला पुढे नेण्यासाठी आॅलिम्पिक कांस्यपदक विजेता विजेंदर सिंग यांची भेट घेतली. या भेटीत गोयल यांनी बॉक्सिंगच्या विकासाबाबत विजेंदरशी चर्चा केली.
मागील चार वर्षांपासून प्रशासकीय कारणांमुळे निर्माण होणाऱ्या अडथळ््यांचा परिणाम देशातील बॉक्सिंगवर होत आहे. बॉक्सर्सना त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. गोयल यांनी याबाबत चर्चा करण्यासाठीच विजेंदरला निमंत्रण दिले होते. विजेंदर म्हणाला की, क्रीडा मंत्र्यांनी बॉक्सिंगला नवसंजिवनी देण्यासाठी चर्चा केली. भारतातील खेळाबाबत मी काय विचार करतो हे मी त्यांना सांगितले.’’
नवीन महासंघ बनवण्यासाठी २५ रोजी होणारी निवडणूक ही नवीन युगाची सुरूवात असेल. भारतात गेल्या चार वर्षांपासून बॉक्सिंगचे संचलन करण्यासाठी कोणतीही स्थायी संघटना नव्हती, आता देशातील बॉक्सिंगला पुन्हा सुरळीत करण्याची ही अखेरची संधी आहे.