भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) केंद्रातील खेळाडू आज ‘मन की बात’ ऐकण्यास सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 02:17 AM2017-08-27T02:17:51+5:302017-08-27T02:18:42+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकप्रिय रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ ऐकण्यासाठी देशभरातील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) केंद्रातील खेळाडू सज्ज झाले आहे.

Sportspersons of the Indian Sports Authority (SAI) Center today are ready to listen to 'Man Ki Baat' | भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) केंद्रातील खेळाडू आज ‘मन की बात’ ऐकण्यास सज्ज

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) केंद्रातील खेळाडू आज ‘मन की बात’ ऐकण्यास सज्ज

Next

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकप्रिय रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ ऐकण्यासाठी देशभरातील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) केंद्रातील खेळाडू सज्ज झाले आहे. उद्या पंतप्रधान खेळाशी संबंधित आणि विशेषत: २०२० टोकिओ आॅलिम्पिकविषयी आपले विचार मांडू शकतात.
याविषयी खेळाडूंना सांगण्यात यावे, असे देशभरातील साई केंद्राच्या वरिष्ठ अधिकाºयांना कळवण्यात आले आहे. क्रीडामंत्रालयाशी निगडित एका अधिकाºयाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, ‘राष्ट्रीय क्रीडा दिन जवळ आला आहे आणि पंतप्रधान भारतातील खेळांना प्रोत्साहन देऊ इच्छितात. त्यामुळे ते खेळाशी संबंधित अनेक मुद्यांवर आपले विचार मांडतील.’
पतियाळास्थित राष्ट्रीय क्रीडा संघटना (एनआयएस) सह साई देशभरातील १२ मोठे केंद्र आणि ५० पेक्षा छोट्या केंद्राचे संचालन करतो. या केंद्रांत हजारो खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांचा जन्मदिवस २९ आॅगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच वर्षी राष्ट्रपती सर्वोत्तम कामगिरी करणाºया खेळाडूंचा अर्जुन आणि राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करतात. अधिकाºयाने सांगितले, ‘खेळाडू ‘मन की बात’ हा कार्यक्रम ऐकू शकतील यासाठी या कार्यक्रमाचा संदेश खेळाडूंपर्यंत पोहोचवण्यास सर्वच साई केंद्रांना सांगण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Sportspersons of the Indian Sports Authority (SAI) Center today are ready to listen to 'Man Ki Baat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.