स्पॉट फिक्सिंग : अजित चंडेलावर आजन्म तर हिकेन शहावर ५ वर्षांची बंदी

By Admin | Published: January 18, 2016 03:22 PM2016-01-18T15:22:01+5:302016-01-18T19:49:26+5:30

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयने क्रिकेटपटू अजित चंडेलावर आजन्म बंदी तर हिकेन शहावर ५ वर्षांची बंदी घालण्यात आली

Spot-fixing: Ajit Chandela Ajnam and Hiken Shahavar for 5 years | स्पॉट फिक्सिंग : अजित चंडेलावर आजन्म तर हिकेन शहावर ५ वर्षांची बंदी

स्पॉट फिक्सिंग : अजित चंडेलावर आजन्म तर हिकेन शहावर ५ वर्षांची बंदी

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयने क्रिकेटपटू अजित चंडेलावर आजन्म बंदी घातली असून स्पॉट फिक्सिंगचा प्रयत्न केल्याबद्दल मुंबई रणजी संघाचा खेळाडू हिकेन शहावर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. याप्रकरणी बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीचे तीन सदस्य शशांक मनोहर, ज्योतिरादित्य शिंदे आणि निरंजन शहा यांनी चंडेला व शहाची चौकशी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. 
गेल्या वर्षी २४ डिसेंबर रोजी चंडेला व शहा हे समितीसमोर हजर राहिल्यानंतर त्यांना ४ जानेवारी पर्यंत लेखी उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वी आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरण उजेडात आल्यानंतर अजित चंडेला, त्याचे राजस्थान रॉयल्सचे सहकारी एस. श्रीशांत आणि अंकित चव्हाण यांना अटक करण्यात आली होती. त्या तिघांपैकी श्रीशांत व अंकित चव्हाण यांच्यावर यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे. तर आज बीसीसीआयने चंडेलावरही आजन्म बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला. 
तर बीसीसीआयच्या लाचलुचपतविरोधी नियमांचा भंग केल्याचा आरोप  मुंबई रणजी संघाचा खेळाडू हिकेन शहावर ठेवण्यात आला असून त्याच्यावर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली. 
यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा हॅन्सी क्रोनिए याच्यावर मॅचफिक्सिंगप्रकरणी आजन्म बंदी टाकण्यात आली होती.
 
फिक्सिंग प्रकरणी बंदी घालण्यात आलेले क्रिकेटपटू :
आंतरराष्ट्रीय क्रिकेट -
1. सलीम मलिक (पाकिस्तान) : आजन्म बंदी - 2000 साली लाच दिल्याप्रकरणी बंदी करण्यात आले. तसेच याप्रकरणी जेलमध्ये जाणारा पहिला क्रिकेटपटू.
2. अता - उर - रेहमान (पाकिस्तान) : आजन्म बंदी - 2000 साली सट्टेबाजांसह व्यवहार केल्याने बंदी.
3. मोहम्मद अझरुद्दिन (भारत) : आजन्म बंदी - 2000 साली सट्टेबाजांच्या संपर्कात राहिल्याने आणि बुकींना माहिती पुरावल्याप्रकरणी दोषी. 
4. अजय शर्मा (भारत) : आजन्म बंदी - 2000 साली सट्टेबाजांच्या संपर्कात राहिल्याचा आरोप
5. मनोज प्रभाकरत (भारत) : 5 वर्षाची बंदी - 2000 साली फिक्सिंग प्रकरणात दोषी.
6. अजय जडेजा (भारत) : 5 वर्षाची बंदी - सट्टेबाजांच्या संपर्कात असल्याचे आढळले. 
7. हॅन्सी क्रोनिए (दक्षिण आफ्रिका) : आजन्म बंदी - सट्टेबाजांकडून पैसे घेतल्याप्रकरणी पकडला गेला.
8. हर्षेल गिब्ज (दक्षिण आफ्रिका) : 6 महिने बंदी - सुरुवातीला फिक्सिंगला बळी मात्र नंतर फिक्सिंगची ऑफर धुडकावून लावली होती.
9. हेन्री विलियम्स (दक्षिण आफ्रिका) : 6 महिने बंदी - सुमार गोलंदाजीसाठी फिक्सिंग केली. मात्र प्रत्यक्ष सामन्यात काहीवेळाने दुखापतग्रस्त झाला. 
10. मॉरिस ओदुंबे (केनिया) : 5 वर्षाची बंदी - सट्टेबाजांकडून पैसे घेतले.
11. मार्लन सॅम्युअल्स (वेस्ट इंडिज) : 2 वर्षाची बंदी - सट्टेबाजाला संघाची माहिती पुरवली.
12. मोहम्मद आमीर (पाकिस्तान) : 5 वर्षाची बंदी -  2010 इंग्लंड दौरा स्पॉट फिक्सिंग
13. मोहम्मद आसीफ (पाकिस्तान) : 7 वर्षाची बंदी -  2010 इंग्लंड दौरा स्पॉट फिक्सिंग
14. सलमान बट (पाकिस्तान) : 10 वर्षाची बंदी - 2010 इंग्लंद दौरा स्पॉट फिक्सिंग
15. दानिश कानेरिया (पाकिस्तान) : आजन्म बंदी - 2010 मध्ये इसेक्स कडून खेळताना संयशास्पद खेळी. यानंतर ईसीबीने चौकशी केल्यानंतर दोषी.
16. श्रीसांत (भारत) : आजन्म बंदी - 2013 साली आयपीएल स्पॉट फिक्सिंग
17. मोहम्मद अश्रफुल (बांगलादेश) : 8 वर्षाची बंदी - 2013 साली बांगलादेश प्रिमियर लीग फिक्सिंग प्रकरणात सहभाग.
18. लोऊ विन्सेंट (न्यूझीलंड) : आजन्म बंदी - इंग्लिश स्थानिक क्रिकेट स्पर्धेत सामना फिक्स केल्याप्रकरणी दोषी.
19. कौशल लोकुआरचछी (श्रीलंका) : 18 महिन्यांची बंदी - बांगलादेश प्रिमियर लीग स्पर्धेत फिक्सिंग प्रकरणी दोषी
 
फिक्सिंग प्रकरणी बंदी घालण्यात आलेले स्थानिक क्रिकेटपटू :
प्रथम श्रेणी क्रिकेट :
1. मेर्विन वेस्टफिल्ड (इसेक्स - इंग्लंड) : 5 वर्षाची बंदी - 2010 मध्ये संशयास्पद खेळी.  स्पॉट फिक्सिंग
2. टी. पी. सुधींद्र (डेक्कन चाजर्र्स - भारत) : आजन्म बंदी - देशांतर्गत स्पर्धेत स्पॉट फिक्सिंग
3. मोहनीश मिश्र (डेक्कन चाजर्र्स - भारत) : एक वर्ष बंदी - स्पॉट फिक्सिंग
4. अमित यादव (किंग्स इलेव्हन पंजाब - भारत) : एक वर्ष बंदी - स्पॉट व मॅच फिक्सिंग
5. अभिनव बाली (किंग्स इलेव्हन पंजाब - भारत) : एक वर्ष बंदी - स्पॉट व मॅच फिक्सिंग
6. शलभ श्रीवास्तव (किंग्स इलेव्हन पंजाब - भारत) : 5 वर्षाची बंदी - मॅच फिक्सिंग केल्याची कबुली दिली.
7. शरीफुल हक (ढाका ग्लॅडीएटर्स - बांगलादेश) : अनिश्चित काळार्पयत बंदी - स्पॉट फिक्सिंग
8. अंकीत चव्हाण (राजस्थान रॉयल्स - भारत) : आजन्म बंदी - स्पॉट फिक्सिंग
9. अमित सिंग (राजस्थान रॉयल्स - भारत) : 5 वर्षाची बंदी - बुकी आणि राजस्थान रॉयल्सचे खेळाडू यांच्यातील दुवा राहिल्याप्रकरणी दोषी.
10. सिध्दार्थ त्रिवेदी (राजस्थान रॉयल्स - भारत) : एक वर्ष बंदी - बुकींनी संपर्क केल्याचे न कळवल्याने कारवाई. 
11. नावेद आरीफ (सससेक्स - पाकिस्तान) : आजन्म बंदी - संघटनेचा भ्रष्टाचार विरोधी कायदाचा भंग केल्याप्रकरणी दोषी.
 
 

 

Web Title: Spot-fixing: Ajit Chandela Ajnam and Hiken Shahavar for 5 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.