श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला चारली धूळ, मालिकाही जिंकली

By admin | Published: February 19, 2017 06:41 PM2017-02-19T18:41:09+5:302017-02-19T20:12:23+5:30

श्रीलंकेनं अटीतटीच्या लढतीत ऑस्ट्रेलियावर मात करत टी-20 मालिकेत विजय मिळवला आहे.

Sri Lanka also won the series of fishes, Australia series | श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला चारली धूळ, मालिकाही जिंकली

श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला चारली धूळ, मालिकाही जिंकली

Next

ऑनलाइन लोकमत
गीलाँग, दि. 19 - शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या दुस-या ट्वेंटी-20 लढतीत श्रीलंकेने ऑस्ट्रेलियावर दोन गडी राखून मात केली. एसेला गुणरत्नेने नाबाद 84 धावांची खेळी करत एकवेळ पराभवाच्या छायेत असलेल्या श्रीलंकेला थरारक विजय मिळवून दिला. त्याबरोबरच तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.

श्रीलंकेला शेवटच्या चार षटकांत 52 धावांची गरज असतानाच त्यांच्याकडे फक्त 3 बळी शिल्लक होते. गुणरत्नेनं 19व्या षटकात हेनरिकच्या गोलंदाजीवर तीन षटकार आणि एक चौकार लगावत 22 धावा केल्या. त्यानंतर शेवटच्या षटकांत श्रीलंकेला विजयासाठी 14 धावांची गरज होती. गुणरत्नेनं लसिथ मलिंगाच्या जोडीनं उत्कृष्ट खेळीचा नजराणा पेश करत हा विजय साजरा केला आहे.

श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियासोबत लागोपाठ टी-20तली ही तिसरी मालिका खिशात घातली आहे. श्रीलंकेनं फलंदाजी करताना 40 धावांवर 5 बळी गमावले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांसमोर सुरुवातीला श्रीलंकेच्या फलंदाजांचा निभाव लागत नव्हता. मात्र श्रीलंकेच्या फलंदाजांना शेवटच्या षटकांत सूर गवसल्यानं त्यांनी हा विजय खेचून आणला.

Web Title: Sri Lanka also won the series of fishes, Australia series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.