श्रीलंकेचा यूएईवर विजय

By admin | Published: February 26, 2016 04:04 AM2016-02-26T04:04:01+5:302016-02-26T04:04:01+5:30

दिनेश चंडीमलचे अर्धशतक, लसिथ मलिंगा (४ बळी) व नुवान कुलशेखराच्या (३ बळी) भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने यूएईला १४ धावांनी पराभूत केले. स्वप्निल पाटीलने

Sri Lanka beat UAE | श्रीलंकेचा यूएईवर विजय

श्रीलंकेचा यूएईवर विजय

Next

मिरपूर : दिनेश चंडीमलचे अर्धशतक, लसिथ मलिंगा (४ बळी) व नुवान कुलशेखराच्या (३ बळी) भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने यूएईला १४ धावांनी पराभूत केले. स्वप्निल पाटीलने ३७ धावा टोलावत दिलेली एकाकी झुंज यूएईला विजय मिळवून देण्यात अपुरी ठरली.
मिरपूरच्या शेर ए बांगला स्टेडियमवर अशियाई चषक टी-टष्ट्वेन्टी स्पर्धेचा सामना झाला. युएईने प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेला १२९ धावांत रोखले. त्यानंतर विजयासाठी १३० धावांचा पाठलाग करताना युएईचा डाव २० षटकांत ९ बाद ११५ धावांत आटोपला.
मलिंगाच्या पहिल्याच चेंडूवर सलामीवीर रोहन मुस्तफा पायचीत झाला. त्यानंतर मोहम्मद शहझाद (१) , मोहम्मद कलीम (७), मुहम्मद उस्मान (६), शइम अन्वर (१३), सकलेन हैदर (१) किरकोळीत बाद झाले. त्यामुळे युएईची अवस्था ६ बाद ४७ अशी बिकट झाली. स्वप्निल पाटीलने ३६ चेंडूत ३ चौकार व २ षटकाराच्या सहाय्याने ३७ धावा टोलावत सामन्यात रंगत आणली.

संक्षिप्त धावफलक
श्रीलंका : २० षटकांत ८ बाद १२९ (दिनेश चंडीमल ५०, तिलकरत्ने दिलशान २७, शेहन जयसूर्या १०, नुवान कुलशेखरा १०, मोहंमद नावेद २/२७, अमजद जावेद ३/२५, मोहंमद शहजाद २/२७, रोहन मुस्तफा १/१७).
यूएई : २० षटकांत ९ बाद ११५ (स्वप्निल पाटील ३७, शइम अन्वर १३, अमजद जावेद १३, मोहंमद नावेद १०, लसिथ मलिंगा ४/२६, नुवान कुलशेखरा ३/१०, रंगना हेराथ २/२२).

Web Title: Sri Lanka beat UAE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.