परेराच्या डोपिंगच्या चुकीच्या शिक्षेप्रकरणी नुकसानभरपाई मागणार : श्रीलंका क्रिकेट
By Admin | Published: July 6, 2016 09:41 PM2016-07-06T21:41:49+5:302016-07-06T21:41:49+5:30
फलंदाज कुशाल परेरा याला बंदी असलेल्या स्टेरॉईडचा उपयोग करण्यासंबंधी चुकीची शिक्षा सुनावण्याच्या विरोधात श्रीलंका क्रिकेट वाडाकडून नुकसानभरापईची मागणी करणार आहे.
कोलंबो : फलंदाज कुशाल परेरा याला बंदी असलेल्या स्टेरॉईडचा उपयोग करण्यासंबंधी चुकीची शिक्षा सुनावण्याच्या विरोधात श्रीलंका क्रिकेट वाडाकडून नुकसानभरापईची मागणी करणार आहे.
श्रीलंकन क्रिकेटचे अध्यक्ष तिलंगा सुमितापाला म्हणाले, ह्यह्यआयसीसी समितीने अहवाल मागितला असून आम्ही त्यांच्याकडून शपथपत्रातील सर्व कायदेशीर आणि झालेल्या चिकित्सा खर्चाची नुकसानभरपाईची मागणी केली आहे. ही रक्कम त्याला निरपराध सिद्ध करण्यासाठी खर्च झाली आहे.
याविषयी त्यांनी म्हटले की, रक्कम परेराच्या इंग्लंड दौऱ्यावरून परतल्यानंतर निश्चित केली जाईल. याविषयी आयसीसी आणि एसएलसजी एकजूट आहेत. विश्व क्रिकेट इतिहासात असे याआधी कधी घडले नाही.ह्णह्ण
परेरा लॅब टेस्टच्या डोप डेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर त्याने विनंती केल्यानंतर लॅबकडून चुकी झाल्याचे सांगण्यात आले होते. या बंदीमुळे परेरा फेब्रुवारी महिन्यात टी २0 वर्ल्डकप खेळू शकला नव्हता.