भारताविरुद्ध श्रीलंकेने आक्रमक खेळावे : संगकारा

By Admin | Published: June 7, 2017 12:34 AM2017-06-07T00:34:58+5:302017-06-07T00:34:58+5:30

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ‘करा किंवा मरा’ अशा सामन्यात विजय मिळविण्यासाठी श्रीलंकेने भारताचे आव्हान आक्रमकपणे स्वीकारावे

Sri Lanka should play aggressive against India: Sangakkara | भारताविरुद्ध श्रीलंकेने आक्रमक खेळावे : संगकारा

भारताविरुद्ध श्रीलंकेने आक्रमक खेळावे : संगकारा

googlenewsNext

लंडन : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ‘करा किंवा मरा’ अशा सामन्यात विजय मिळविण्यासाठी श्रीलंकेने भारताचे आव्हान आक्रमकपणे स्वीकारावे, अशी सूचना माजी कर्णधार कुमार संगकारा याने केली आहे. द. आफ्रिकेकडून पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर श्रीलंकेला भारताविरुद्ध कुठल्याही स्थितीत विजय नोंदविणे क्रमप्राप्त झाले आहे.
लंकेचा कर्णधार उपुल थरंगा मंदगती षटके टाकल्याबद्दल दोन सामन्यांसाठी निलंबित झाला आहे. अँजेलो मॅथ्यूजदेखील फिटनेसच्या कारणास्तव बाहेर आहे. लंकेला ही स्थिती मुळीच आदर्शवत नाही. मॅथ्यूज न खेळल्यास संघाच्या अपेक्षांना धक्का बसेल. भारताविरुद्ध सुरुवातीच्या दहा षटकांत गडी बाद करणे फारच महत्त्वाचे राहील. भारतीय गोलंदाजांची कामगिरीदेखील फार उच्च दर्जाची आहे. भारतीय माऱ्यात विविधता असल्यामुळे लंकेच्या फलंदाजांसोबतच गोलंदाजांनादेखील बरोबरीचे योगदान द्यावे लागेल. याशिवाय आमच्या संघाच्या क्षेत्ररक्षणात बऱ्याच उणिवा आहेत. त्यादेखील दूर होणे गरजेचे आहे.’
(वृत्तसंस्था)
‘लंकेच्या युवा संघाने आक्रमक खेळ करावा. खेळाडूंनी स्वत:ची प्रतिभा दाखवित सकारात्मक खेळ करायला हवा, अशी माझी इच्छा आहे. असे झाल्यास लंकेचा संघ भारतावर सनसनाटी विजय नोंदवू शकतो. पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय संघापुढे श्रीलंकेचा विजय सोपा नाही. त्यासाठी आक्रमक खेळ करावाच लागेल.’
- कुमार संगकारा

Web Title: Sri Lanka should play aggressive against India: Sangakkara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.