सेक्स टेप लीक प्रकरणात जयसुर्याला श्रीलंकन बोर्ड देणार धक्का

By admin | Published: June 1, 2017 12:38 PM2017-06-01T12:38:50+5:302017-06-01T13:20:10+5:30

सेक्स टेप लीक प्रकरणात श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसुर्याला पद सोडून किंमत चुकवावी लागू शकते.

The Sri Lankan board push Jayasuriya in the sex tape leak case | सेक्स टेप लीक प्रकरणात जयसुर्याला श्रीलंकन बोर्ड देणार धक्का

सेक्स टेप लीक प्रकरणात जयसुर्याला श्रीलंकन बोर्ड देणार धक्का

Next

 ऑनलाइन लोकमत 

कोलंबो, दि. 1 - सेक्स टेप लीक प्रकरणात श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसुर्याला पद सोडून किंमत चुकवावी लागू शकते. जयसुर्या श्रीलंकन निवड समितीचा अध्यक्ष आहे. काहीवर्षांपूर्वीची ही सेक्स टेप आता समोर आली असली तरी, यामुळे श्रीलंकन क्रिकेट आणि देशाची प्रतिमा मलिन झाल्याचे श्रीलंकन क्रिकेट बोर्डाच्या पदाधिका-यांचे मत आहे.
 
 त्यामुळे जयसुर्याला श्रीलंकन निवड समितीवरुन हटवले जाण्याची शक्यता आहे. जयसुर्या सध्या श्रीलंकन निवड समितीचा प्रमुख असून त्याला मुदतवाढ देण्यास बोर्ड अजिबता इच्छुक नसल्याची माहिती आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा संपल्यानंतर जयसुर्या स्वत: आपल्या पदाचा राजीनामा देईल किंवा तसे त्याने नाही केले तर त्याला मुदतवाढ मिळणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली. 
सेक्स टेपमध्ये जयसुर्यासोबत जी तरुणी दिसतेय ती त्याची पूर्वपत्नी आहे. जयसुर्याने आपल्यासोबतचा तो एमएमएस मुद्दाम व्हायरल केल्याचा आरोप त्याच्या तिसऱ्या पत्नीने केलाय. जयसुर्याने जाणीवपूर्वक आपल्याला बदनाम करण्यासाठी ही टेप व्हायरल केला असल्याचे या महिलेने सांगितले. 
 
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर जयसुर्या मुख्य निवडकर्ता राहणार नाही असे एका श्रीलंकन क्रिकेट बोर्डाच्या पदाधिका-याने नाव न छापण्याच्या अटीवर डेक्कन क्रॉनिकल वर्तमानपत्राला सांगितले. 47 वर्षीय जयसुर्याने या वादावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. जयसुर्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर या महिलेने एका प्रतिष्ठीत व्यापाऱ्याबरोबर लग्न केले. 
 
1996 साली जगाला कळली जयसुर्याची ओळख 
सेक्स टेप लीक झाल्यामुळे जयसुर्या आता वादात सापडला असला तरी, या खेळाडूने काहीवर्षांपूर्वी भल्या भल्या गोलंदाजांची झोप उडवली होती. जयसुर्याने 1989 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले पण 1996 वर्ल्डकप स्पर्धेपासून ख-या अर्थाने क्रिकेट जगताला या खेळाडूची ओळख झाली. 1996 च्या वर्ल्डकप स्पर्धेपासून जयसुर्या आणि रोमेश कालुवितर्णा या श्रीलंकन सलामीवीरांच्या जोडीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला. पहिल्या 15 षटकात मोठे फटके खेळून वेगाने धावा जमवण्यास या दोघांनी सुरुवात केली. 
 
जयसुर्याच्या फटकेबाजीच्या जोरावर श्रीलंकेने त्यावेळी वर्ल्डकपची अंतिमफेरी गाठून पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकला. 1996 वर्ल्डकपच्या आधी श्रीलंकेची लिंबू-टिंबू संघांमध्ये गणना केली जायची. जागतिक क्रिकेटमध्ये श्रीलंकेचा दबदबा निर्माण करण्यात जयसुर्याने महत्वाची भूमिका बजावली. 
 
1996 पासून पुढची तीनवर्ष जयसुर्याची बॅटने भल्या भल्या गोलंदाजांना सळो कि पळो करुन सोडले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 12 हजार धावा आणि 300 विकेट घेणारा जयसुर्या एकमेव क्रिकेटपटू आहे. 2011 मध्ये इंग्लंड विरुध्द शेवटची वनडे खेळून या क्रिकेटपटूने क्रिकेटला अलविदा केले. 
 
 

Web Title: The Sri Lankan board push Jayasuriya in the sex tape leak case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.