भारताविरोधात श्रीलंकेनं आक्रमक क्रिकेट खेळावं - संगकारा
By Admin | Published: June 6, 2017 03:50 PM2017-06-06T15:50:38+5:302017-06-06T16:22:46+5:30
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या पराभवामुळे श्रीलंका संघ बॅकफूटवर आला आहे. आठ तारखेला भारताविरोधात होणाऱ्या करो या मरोच्या सामन्यात
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 6 - चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या पराभवामुळे श्रीलंका संघ बॅकफूटवर आला आहे. आठ तारखेला भारताविरोधात होणाऱ्या करो या मरोच्या सामन्यात श्रीलंकेनं आक्रमक क्रिकेट खेळावं असे कुमार संगकाराने म्हटले आहे. आयसीसीसाठी लिहलेल्या लेखात संगकाराने आपल्या संघाला हा सल्ला दिला आहे. या लेखात तो म्हणतो, चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. भारताचा पराभव करणं सहजासहजी शक्य नाही. श्रीलंकेला या स्पर्धेत आव्हान टिकवायचे असल्यास भारताविरोधात विजय मिळवणे गरजेचा आहे.
आपल्या लेखात संगकारा पुढे लिहतो, श्रीलंकेच्या युवा संघाने संपूर्ण आक्रमकतेनं खेळावं. संघातील प्रत्येक खेळाडूने आपली प्रतिभा दाखवून द्यावी. श्रीलंकेच्या युवा संघाने सकारात्मक क्रिकेट खेळल्यास भारताला पराभव करु शकतो. पण सध्याच्या भारतीय संघाचा पराभव करणं कठीण आहे. श्रीलंकेची सर्वात मोठी अडचण म्हणजे दोन्ही कर्णधार भारताविरोधात खेळू शकणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मर्यादित वेळेत षटके न टाकल्यामुळे आयसीसीने उपुल थरंगावर दोन सामन्याची बंदी घातली आहे. तर मॅथ्यूज दुखपतीमुळे खेळण्याबाबात प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे श्रीलंका संघाच्या अडचणी वाढल्या आहेत.
भारताविरोधात विजयाचा पाया रचण्यासाठी पहिल्या दहा षटकांत जास्तीत जास्त फलंदाज बाद करावे लागतील. मागिल काही दिवसांमध्ये भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. श्रीलंकेच्या तुलनेत भारताचे क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी अधिक भक्कम आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतील आपले आव्हान कायम ठेवायचे असल्यास श्रीलंकेच्या संघाला सर्वच स्तरावर भारतापेक्षा वरचढ कामगिरी करावी लागेल.