चुरशीच्या लढतीत श्रीलंकन अध्यक्षीय संघ विजयी

By admin | Published: March 23, 2017 12:20 AM2017-03-23T00:20:27+5:302017-03-23T00:20:27+5:30

श्रीलंका अध्यक्षीय एकादश संघाने रोमहर्षक झालेल्या सराव वन-डे सामन्यात बांगलादेश संघावर २ धावांनी निसटता विजय मिळवला.

Sri Lankan presidential team won the match | चुरशीच्या लढतीत श्रीलंकन अध्यक्षीय संघ विजयी

चुरशीच्या लढतीत श्रीलंकन अध्यक्षीय संघ विजयी

Next

कोलंबो : श्रीलंका अध्यक्षीय एकादश संघाने रोमहर्षक झालेल्या सराव वन-डे सामन्यात बांगलादेश संघावर २ धावांनी निसटता विजय मिळवला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ७ बाद ३५४ धावांचा डोंगर रचला. श्रीलंकेकडून संदन वीरोकोडे याने सर्वाधिक ५४ चेंडूंत ८ चौकार, २ षटकारांसह ६७ धावा केल्या. कौशल परेराने ७८ चेंडूंत ६४, चतुरंगा डिसिल्वाने ४७ चेंडूंत ५२, थिसारा परेराने ३० चेंडूंत ४१ धावा केल्या. बांगलादेशकडून मोहंमद शफीउद्दीन आणि सनझुम इस्लाम यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ ५० षटकांत ८ बाद ३५२ धावा करू शकला. त्यांच्याकडून शब्बीर रहमानने ६३ चेंडूंत ११ चौकार, एका षटकारासह सर्वाधिक ७२ धावांची खेळी केली. महमुदुल्लाहने ६८ चेंडूंत ४ चौकार व एका षटकारासह नाबाद ७१, मोसदक हुसैनने ५३ व मुशर्रफा मोर्तजाने ३५ चेंडूंत ५८ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक : श्रीलंका अध्यक्षीय एकादश संघ : ५० षटकांत ७ बाद ३५४. (संदन वीरोकोडे ६७, कौशल परेरा ६४, चतुरंगा डिसिल्वा ५२, थिसारा परेरा ४१. बांगलादेश : ५० षटकांत ८ बाद ३५२. (शब्बीर रहमान ७२, महमुदुल्लाह नाबाद ७१, मोसदक हुसैन ५३, मशुर्रफा मोर्तजा ५८. अकिला धनंजय ३/६१, चतुरंगा डिसिल्वा २/५३).

Web Title: Sri Lankan presidential team won the match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.