श्रीलंकेपुढे ४०५ धावांचे लक्ष्य

By admin | Published: December 13, 2015 11:21 PM2015-12-13T23:21:45+5:302015-12-13T23:21:45+5:30

सलामीवीर टॉम लॅथमची (नाबाद १०९) शतकी खेळी आणि केन विल्यम्सनसोबत (७१) दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या १४१ धावांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्ध

Sri Lanka's target of 405 runs | श्रीलंकेपुढे ४०५ धावांचे लक्ष्य

श्रीलंकेपुढे ४०५ धावांचे लक्ष्य

Next

ड्युनेडिन : सलामीवीर टॉम लॅथमची (नाबाद १०९) शतकी खेळी आणि केन विल्यम्सनसोबत (७१) दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या १४१ धावांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात दुसरा डाव
चौथ्या दिवशी ३ बाद २६७ धावसंख्येवर घोषित केला आणि पाहुण्या संघापुढे विजयासाठी ४०५ धावांचे लक्ष्य ठेवले.
१ बाद १७१ धावसंख्येवरून पुढे खेळणाऱ्या न्यूझीलंड संघाचा दुसरा डाव कर्णधार ब्रॅन्डन मॅक्युलमने ६५.४ षटकांनंतर ३ बाद २६७ धावसंख्येवर घोषित केला. श्रीलंका संघाने दिवसअखेर ५०.१ षटकांत ३ बाद १०९ धावांची मजल मारली होती. श्रीलंका संघाला विजयासाठी अद्याप २९६ धावांची गरज असून, त्यांच्या ७ विकेट शिल्लक आहेत.
लॅथमने १८० चेंडूंना सामोरे जाताना ८ चौकार ठोकले. विल्यम्सनने ११५ चेंडूंमध्ये ७ चौकारांच्या मदतीने ७१ धावा केल्या. विल्यम्सनला दुष्मांता चमीराने माघारी परतवले. त्यानंतर खेळपट्टीवर आलेल्या रॉस टेलरला (१५) मोठी खेळी करता आली नाही. रंगाना हेराथने त्याला क्लीन बोल्ड करीत माघारी धाडले.
कर्णधार मॅक्युलमने आक्रमक फलंदाजी करीत ६ चेंडूंमध्ये २ षटकारांच्या मदतीने नाबाद १७ धावा फटकावल्या. त्यानंतर मॅक्युलमने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. रंगाना हेराथने ११.४ षटकांत ६२ धावांच्या मोबदल्यात २, तर चमीराने १४ षटकांत ६१ धावांच्या मोबदल्यात १ बळी घेतला.
४०५ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंका संघाची सुरुवात विशेष चांगली झाली नाही. त्यांची ३२.३ षटकांत २ बाद ६४ अशी अवस्था झाली होती. सलामीवीर दिमुथ करुणारत्नेने संथ फलंदाजी करताना ७२ चेंडूंमध्ये केवळ १ चौकार मारताना २९ धावा फटकावल्या. त्याला टीम साऊदीने माघारी परतवले. पदार्पणाची कसोटी खेळणारा
उदारा जयसुंदराने १५ चेंडूंमध्ये केवळ
३ धावा केल्या. त्याला नील वाग्नरने बाद केले. त्यानंतर कुशल मेंडिस व दिनेश चंडीमल यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी केली. मेंडिस (४६) साऊदीचा
दुसरा बळी ठरला. त्याने १५०
चेंडूंमध्ये ५ चौकार ठोकले. चंडीमलने ६४ चेंडूंमध्ये ७ चौकारांच्या
मदतीने नाबाद ३१ धावा केल्या
आहेत. (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक
न्युझिलंड : पहिला डाव सर्वबाद ४३१; श्रीलंका : पहिला डाव सर्वबाद २९४
न्युझिलंड ; दुसरा डाव २६७/३ घोषीत : टॉम लॅथम १०९, मार्टिन गुप्तील ४६, केन विल्यमसन ७१, गोलंदाजी : रंगना हेराथ २/६२, दुश्मंथा चमिरा १ /६१ श्रीलंका दुसरा डाव १०९/३; दिमुथ करुणारत्ने २९, कौशल मेन्डीस ४६,दिनेश चंडिमल ३१ नाबाद; गोलंदाजी : टीम साऊथी २/१६, नील वॅग्नर १/२८.

Web Title: Sri Lanka's target of 405 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.