लंकेची गाठ अफगाणिस्तानशी

By admin | Published: February 21, 2015 11:50 PM2015-02-21T23:50:23+5:302015-02-21T23:50:23+5:30

सलामीला पराभवाचा धक्का बसलेल्या श्रीलंकेला उद्या विश्वचषकात दुबळ्या अफगाणिस्तानविरुद्ध ‘अ’ गटात खेळावे लागणार आहे.

Sri Lanke knock out against Afghanistan | लंकेची गाठ अफगाणिस्तानशी

लंकेची गाठ अफगाणिस्तानशी

Next

ड्यूनेडिन : सलामीला पराभवाचा धक्का बसलेल्या श्रीलंकेला उद्या विश्वचषकात दुबळ्या अफगाणिस्तानविरुद्ध ‘अ’ गटात खेळावे लागणार आहे. ही लढत जिंकून विजयी पथावर येण्याचे लंकेचे प्रयत्न राहतील. लंकेला न्यूझीलंडने ९८ धावांनी नमविले होते.
अफगाणिस्तान पहिल्या सामन्यात बांगलादेशकडून पराभूत झाला खरा, पण त्यांच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली होती. उद्या जो संघ पराभूत होईल त्या संघाला बाद फेरीपासून वंचित व्हावे लागेल. परिस्थिती ओळखून अफगाणसारख्या संघाविरुद्धदेखील दिग्गज खेळाडूला विश्रांती न देण्याचा निर्णय लंकेने घेतला आहे. लंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज म्हणाला,‘‘आम्ही सर्वांत भक्कम संघ खेळू. (वृत्तसंस्था)

श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), लाहीरू थिरीमने (उपकर्णधार), दिनेश चंडीमल, तिलकरत्ने दिलशान, रंगना हेरथ, महेला जयवर्धने, दिमुथ करूणारत्ने, नुवान कुलसेकरा, सुरंगा लकमल, लसिथ मलिंगा, जीवन मेंडिस, थिसारा परेरा, धम्मिका प्रसाद, कुमार संगकारा (यष्टीरक्षक), सचिथ्रा सेनानायके

अफगाणिस्तान : मोहम्मद नाबी (कर्णधार), अफसार जाजाई (यष्टीरक्षक), आफ्ताब आलम, असघर स्तानिक्झाई, दवलत जद्रान, गुलबादीन नैब, हामिद हसन, जावेद अहमदी, मिरवैस अर्शफ, नाजीबुल्लाह जद्रान, नासीर जमाल, नवरोज मंगल, सॅमिउल्लाह शेनवारी, शपूर जद्रान, उसमान घानी, हशमातुल्लाह शाइदी, इजातुल्लाह दवलतजाई, शाफिकउल्लाह, शराफुद्दीन अशराफ

हेड टू हेड
४श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये आतापर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्ये एकच लढत झाली आहे व ती लढत श्रीलंकेने जिंकली आहे.

Web Title: Sri Lanke knock out against Afghanistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.