श्रीकांत उपउपांत्यपूर्व फेरीत पराभूत

By admin | Published: March 4, 2017 05:09 AM2017-03-04T05:09:53+5:302017-03-04T05:09:53+5:30

बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत हा जर्मन ओपन ग्रॅण्डप्रिक्स गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात पराभूत होताच बाहेर पडला

Srikanth lost in pre-quarterfinal round | श्रीकांत उपउपांत्यपूर्व फेरीत पराभूत

श्रीकांत उपउपांत्यपूर्व फेरीत पराभूत

Next


मुल्हेम (जर्मनी) : आघाडीचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत हा जर्मन ओपन ग्रॅण्डप्रिक्स गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात पराभूत होताच बाहेर पडला. पराभूत होण्याआधी श्रीकांतने चीनचा आॅलिम्पिक चॅम्पियन चेन लोंग याच्याविरुद्ध जबरदस्त संघर्ष केला. त्याच्या पराभवामुळे भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
१२ व्या स्थानावर असलेला श्रीकांत याला काल ४७ मिनिटांच्या खेळात पुरुष एकेरीत दोन वेळेचा विश्वविजेता व आॅल इंग्लंड चॅम्पियन चेन लोंग याने १९-२१, २०-२२ अशा फरकाने पराभूत केले. गुडघ्याच्या दुखापतीतून सावरलेल्या श्रीकांतने दोन्ही गेममध्ये १२-६, १६-१२ अशी आघाडी संपादन केली होती. पण निर्णायक वेळी आघाडी गमवल्याने त्याला पराभूत व्हावे लागले. (वृत्तसंस्था)
>जर्मन ओपन बॅडमिंटन; चेन लोंगविरुध्दचा संघर्ष असफल

Web Title: Srikanth lost in pre-quarterfinal round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.