बीसीसीआयमध्ये ‘श्रीनि’नाट्य

By admin | Published: August 29, 2015 01:21 AM2015-08-29T01:21:13+5:302015-08-29T01:21:13+5:30

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या उपस्थितीवरून खडाजंगी होताच कार्यसमितीची महत्त्वाची बैठक अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी शुक्रवारी अनिश्चित

'Srinani' drama in BCCI | बीसीसीआयमध्ये ‘श्रीनि’नाट्य

बीसीसीआयमध्ये ‘श्रीनि’नाट्य

Next

कोलकाता : बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या उपस्थितीवरून खडाजंगी होताच कार्यसमितीची महत्त्वाची बैठक अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी शुक्रवारी अनिश्चित काळासाठी स्थगित केली. आयपीएलप्रकरणी स्थापन झालेल्या चार सदस्यांच्या आयसमूहाच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी बोलविण्यात आलेल्या बैठकीला नाट्यमय वळण लागले. बोर्डाची वार्षिक सर्वसाधारणसभा २७ सप्टेंबर रोजी कोलकाता येथे होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या न्या. लोढा समितीने चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन फ्रॅन्चायसींना दोन वर्षांसाठी निलंबित केले होते. त्यानंतर कार्यसमूहाची स्थापना करण्यात आली. श्रीनिवासन यांच्या उपस्थितीवरून ही बैठक रद्द करण्यात आली. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर सुप्रीम कोर्टाने श्रीनिवासन यांना बीसीसीआय अध्यक्षपदाची निवडणूक लढण्यास मज्जाव केला होता. तामिळनाडू क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष या नात्याने श्रीनिवासन हे बैठकीत उपस्थित झाले. त्यांनी स्वत:च्या बचावासाठी न्या. श्रीकृष्ण यांच्या निर्णयाचा उल्लेख केला. न्या. श्रीकृष्ण यांनी श्रीनिवासन हे बैठकीत सहभागी होऊ शकतात, असे म्हटले होते. बीसीसीआयच्या काही सदस्यांनी मात्र त्यांचा युक्तीवाद फेटाळून लावला, शिवाय सुप्रीम कोर्टाने श्रीनिवासन यांना बैठकांपासून दूरत ठेवल्याचे सांगितले. बैठकीला उपस्थित असलेला एक अधिकारी म्हणाला,‘श्रीनिवासन यांच्या बाबत कायदेशीर प्रक्रियेत स्पष्टपणा नसल्याने बैठक अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली. बोर्डाचे सल्लागार उषानाथ बॅनर्जी यांनी देखील श्रीनिवासन यांच्या उपस्थितीबाबत कायदेशीर प्रक्रिया सध्या स्पष्ट नसल्याचे सांगितले. श्रीनिवासन यांना बैठकीपासून दूर राहा असा सल्ला आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्ला आणि कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांनी दिला होता. त्यानंतरही श्रीनिवासन बैठकीत उपस्थित झाले. क्रीडा प्रशासक आणि चेन्नई सुपरकिंग्सच्या इंडिया सिमेंट कंपनीचे मालक म्हणून माझी कुठलीही दुहेरी भूमिका नाही, हे त्यांनी पटवून सांगण्याचा प्रयत्नदेखील केला.

अर्थसमितीची बैठकही गुंडाळली
बीसीसीआयच्या अर्थसमितीची बैठकदेखील अध्यक्ष ज्योतिरादित्य शिंदे यांच्या अनुपस्थितीमुळे कुठलाही मोठा निर्णय न घेताच गुंडाळण्यात आली. केवळ वार्षिक खात्यांना मंजुरी प्रदान करण्यात आली.
वित्त समितीच्या अनुपस्थितीत कुठलाही मोठा निर्णय घेण्यात येत नाही. शिंदे सध्या अमेरिकेत आहेत. महिला क्रिकेटपटूंना ग्रेड आधारित पेमेंट आणि कामगिरीच्या आधारे प्रोत्साहन या दोन धोरणात्मक निर्णयावर चर्चा झाली नाही.

मुख्य मुद्यांकडे दुर्लक्ष
कार्यसमिती बैठकीत लोढा समितीचा अहवाल आणि त्यावर कार्यसमूहाने दिलेला सल्ला यावर चर्चा होणार होती. याशिवाय सीएसकेने दाखल केलेल्या याचिकेवर शपथपत्र दाखल करण्याची गरज आहे काय, यावर विचार होणार होता.
याप्रकरणी पुढील सुनावणी २३ सप्टेंबर रोजी होईल. एनसीए अकादमी बेंगळुरु येथे कायम ठेवावी की अन्यत्र हलवावी यावर निर्णय घ्यायचा होता. छत्तीसगड, बिहार, मणिपूर यांच्या मान्यतेचा निर्णय आणि तांत्रिक समितीने दिलेल्या सल्ल्यावर विचार करण्यात येणार होता.

Web Title: 'Srinani' drama in BCCI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.