‘श्रीनि’प्रकरणी बीसीसीआयची सुप्रीम कोर्टात धाव
By admin | Published: September 13, 2015 04:15 AM2015-09-13T04:15:13+5:302015-09-13T04:15:13+5:30
कार्य समितीच्या बैठकीत एन. श्रीनिवासन यांची उपस्थिती वैध आहे काय, हे जाणून घेण्यासाठी बीसीसीआयने शनिवारी सुप्रीम कोर्टात धाव घेतली.
नवी दिल्ली : कार्य समितीच्या बैठकीत एन. श्रीनिवासन यांची उपस्थिती वैध आहे काय, हे जाणून घेण्यासाठी बीसीसीआयने शनिवारी सुप्रीम कोर्टात धाव घेतली.
आयपीएलमधून निलंबित करण्यात आलेल्या चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या भविष्यावर चर्चा करण्यासाठी बोर्डाने मागच्या महिन्यात कोलकाता येथे कार्य समितीची बैठक बोलावली होती. बोर्डाची परवानगी न घेताच श्रीनिवासन हे या बैठकीला हजर राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. तमिळनाडूचे प्रतिनिधी या नात्याने बैठकीला आल्याची सबब श्रीनिवासन यांनी बैठकीत दिली होती. श्रीनिवासन यांना बैठकीत सहभागी होण्यापासून रोखण्यासाठी कायदेशीर कुठलीही स्पष्टता नाही. सीएसकेमध्येही त्यांची कंपनी इंडिया
सिमेंटमधील त्यांच्या भागीदारीबद्दल स्पष्ट उल्लेख नाही. इंडिया सिमेंटच्या व्यवस्थापनाने सीएसके ही कंपनीपासून वेगळी फर्म असल्याचे सांगितले होते. कंपनीचे नवे नाव चेन्नई सुपर किंग्स क्रिकेटर्स लिमिटेड असे ठेवण्यात आले.