अँडरसन प्रकरणात श्रीनिवासन यांचा हस्तक्षेप

By admin | Published: August 10, 2014 02:53 AM2014-08-10T02:53:11+5:302014-08-10T02:53:11+5:30

आपले स्थान वाचविण्यासाठी एन. श्रीनिवासन यांनी जेम्स अँडरसन-रवींद्र जडेजा प्रकरणात हस्तक्षेप केला

Srinivasan intervened in Anderson case | अँडरसन प्रकरणात श्रीनिवासन यांचा हस्तक्षेप

अँडरसन प्रकरणात श्रीनिवासन यांचा हस्तक्षेप

Next
>नवी दिल्ली : आपले स्थान वाचविण्यासाठी एन. श्रीनिवासन यांनी जेम्स अँडरसन-रवींद्र जडेजा प्रकरणात हस्तक्षेप केला, असा आरोप एन. श्रीनिवासन यांच्याविरुद्ध आघाडी उघडणारे बिहार क्रिकेट संघटनेचे सचिव आदित्य वर्मा आणि माजी केंद्रीय मंत्री सुबोधकांत सहाय यांनी संयुक्तपणो आयोजित पत्रकार परिषदेत केला.
झारखंड संघटनेचे अध्यक्ष सुबोधकांत सहाय व आदित्य वर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की ‘श्रीनिवासन यांनी आयसीसीमध्ये आपली सत्ता कायम राखण्यासाठी सारवासारव केल्यामुळे भारतीय खेळाडूंवर नामुष्की आली.’ सहाय यांनी श्रीनिवासन यांच्यावर टीका करताना म्हटले, की ‘बीसीसीआयने जडेजा-अँडरसन प्रकरण योग्यपणो हाताळले नाही. श्रीनिवासन यांनी भारतीय खेळाडूंची बाजू योग्यपणो मांडणो आवश्यक होते. या प्रकरणात भारतीय खेळाडूंची पाठराखण केली असती, तर श्रीनिवासन यांना इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या क्रिकेट बोर्डाकडून मिळत असलेल्या सहकार्यापासून वंचित राहावे लागले असते. 
आयसीसीमध्ये त्यांची सत्ता धोक्यात आली असती. श्रीनिवासन यांनी आयसीसी व इंग्लिश बोर्डाला या प्रकरणात वर्चस्व गाजविण्याची संधी दिली. त्यामुळे अँडरसनला या प्रकरणात कुठलीच शिक्षा झाली नाही.’ श्रीनिवासन यांचे विरोधी असलेले आदित्य वर्मा म्हणाले, ‘सध्याची परिस्थिती बघता श्रीनिवासन आणि ईसीबीदरम्यान तह झाल्यामुळे अँडरसनला शिक्षा मिळाली नाही. बीसीसीआयने यात प्रतिनिधित्व करण्यासाठी सुंदररमणसारख्या व्यक्तीला का पाठविले, हे न उलगडणारे कोडे आहे. सुंदररमण यांना बोर्डात विशेष स्थान नाही. 
श्रीनिवासन आणि सुंदररमण यांच्यादरम्यान चांगली मैत्री आहे. त्यामुळे या प्रकरणात आयसीसी मुख्यालयाकडून मिळालेल्या निर्देशांचे पालन करताना श्रीनिवासन यांनी व्यक्तीला इंग्लंडमध्ये पाठविले.’ (वृत्तसंस्था)

Web Title: Srinivasan intervened in Anderson case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.