श्रीनिवासन नव्हे चौधरीच
By admin | Published: April 18, 2017 01:58 AM2017-04-18T01:58:33+5:302017-04-18T01:58:33+5:30
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना पुढील आठवड्यात होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीमध्ये बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे
नवी दिल्ली : बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना पुढील आठवड्यात होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीमध्ये बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे. श्रीनिवासन यापूर्वी हित जोपासण्याच्या मुद्यावर दोषी आढळले असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाने बोर्डाचे कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी यांना २४ एप्रिल रोजी होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीमध्ये बोर्डाचे प्रतिनिधित्व करण्याची परवानगी दिली आहे. न्यायालयाने निर्देश दिले की, त्यांच्यासोबत बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी जातील.
न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती धनंजय वाय. चंद्रचुड यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने स्पष्ट केले की, श्रीनिवासन यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात हित जोपासण्याच्या मुद्यावर दोषी आढळले आहेत. त्यामुळे त्यांना आयसीसीच्या बैठकीमध्ये बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करण्याची परवानगी देता येणार नाही.(वृत्तसंस्था)