स्टार फुटबॉलपटू बेमबेम देवीची निवृत्ती
By admin | Published: January 3, 2016 01:30 AM2016-01-03T01:30:46+5:302016-01-03T01:30:46+5:30
जवळजवळ दोन दशके भारतीय महिला फुटबॉलची धुरा वाहणारी स्टार खेळाडू बेमबेम देवी हिने निवृत्तीचा निर्णय जाहीर करताना कारकिर्दीला पूर्णविराम दिला.
नवी दिल्ली : जवळजवळ दोन दशके भारतीय महिला फुटबॉलची धुरा वाहणारी स्टार खेळाडू बेमबेम देवी हिने निवृत्तीचा निर्णय जाहीर करताना कारकिर्दीला पूर्णविराम दिला.
मणिपूरच्या या ३५वर्षीय खेळाडूने सोशल फेसबुकवर आपल्या निवृत्तीची घोषणा करताना म्हटले आहे की, ‘देशाचे व राज्याचे प्रतिनिधित्व करताना प्रदीर्घ कालावधीपर्यंत खेळण्याची संधी मिळाल्याने स्वत:ला नशीबवान समजते. प्रदीर्घ कालावधीपासून जुळलेल्या खेळातून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेणे सोपे नसते, पण निवृत्ती स्वीकारण्याची हीच वेळ योग्य असल्याचे मला वाटते.’ २००३मध्ये राष्ट्रीय फुटबॉल संघाचे नेतृत्व स्वीकारणाऱ्या बेमबेम देवीच्या कर्णधारपदाखाली भारताने २०१०मध्ये दक्षिण आशियाई स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला होता. बेमबेम देवीची २००१ व २०१३मध्ये एआयएफएफतर्फे वर्षातील सर्वोत्तम महिला फुटबॉलपटू पुरस्कारासाठी निवड झाली होती. (वृत्तसंस्था)
२१व्या सीनिअर महिला फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये खेळाडू म्हणून राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची माझी अखेरची वेळ राहील. प्रदीर्घ कालावधीत मी खेळाचा पूर्णपणे आनंद घेतला आणि कारकिर्दीबाबत समाधानी आहे.
- बेमबेम देवी