जोको, सेरेनाच्या खेळीने मोहिमेची सुरुवात
By Admin | Published: August 30, 2015 02:32 AM2015-08-30T02:32:46+5:302015-08-30T02:32:46+5:30
सर्बियाचा नोव्हाक जोकोविच आणि अमेरीकेची सेरेना विलियम्स हे पुरुष व महिला गटातील अव्वल खेळाडू ३१ आॅगस्टपासून सुरु होणाऱ्या अमेरीकन (यूएस) ओपन टेनिस ग्रँडस्लॅम
न्यूयॉर्क : सर्बियाचा नोव्हाक जोकोविच आणि अमेरीकेची सेरेना विलियम्स हे पुरुष व महिला गटातील अव्वल खेळाडू ३१ आॅगस्टपासून सुरु होणाऱ्या अमेरीकन (यूएस) ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मोहिमेची सुरुवात करतील. त्याचवेळी स्पेनचा हुकमी राफेल नदाल देखील पहिल्याच दिवशी खेळणार असल्याने टेनिसप्रेमींची उत्सुकता वाढली आहे.
दिग्गज स्टेफी ग्राफ हिने १९८८ मध्ये कॅलेंडर वर्षात ग्रँडस्लॅम पुर्ण केल्यानंतर सेरेना विलियम्सला या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची संधी आहे. तीला सलामीला रशियाच्या वितिलिया दियातचेनको विरुध्द खेळावे लागेल. गतमहिन्यात विम्बल्डन जिंकून सलग चौथी प्रतिष्ठीत स्पर्धा जिंकणाऱ्या सेरेनाचे लक्ष्य सध्या यूएस ओपन जिंकून करियर स्लॅमसह कारकिर्दीतील २२वे ग्रँडस्लॅम जिंकण्यावर असेल. सेरेनाने यूएस ओपन जिंकल्यास ती स्टेफी ग्राफच्या २२ ग्रँडस्लॅम विजेतेपदांशी बरोबरी करेल. पुरुष गटामध्ये दुसऱ्या यूएस ओपन विजेतेपदाचा निर्धार केलेल्या जोकोविचला पहिल्या सामन्यात ब्राझीलच्या के जाओ सोजाचे आव्हान असेल. त्याचवेळी उपांत्यपुर्व फेरीत त्याला नदालच्या तगड्या खेळाला सामोरे जाण्याची शक्यता आहे. नदाल देखील स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी खेळणार असून क्रोएशियाचा बोर्ना कोरिच विरुध्द त्याची लढत होईल. गतविजेता क्रिएशियाचा नववा मानांकीत मरिन सिलिच अर्जेटिनाच्या के गुड्डो पेला विरुध्दच्या सामन्याने विजेतेपद राखण्याच्या मोहिमेला सुरुवात करेल.
क्वीतोवाची अंतिम फेरीत धडक
न्यू हेवन : स्टार टेनिसपटू पेत्रा क्वितोवाने धडाकेबाज विजय नोंदवताना चार वेळची चॅम्पियन डेन्मार्कच्या कैरोलिना वोज्नियाकीला नमवले. या दिमाखदार विजयासह क्वीतोवाने डब्ल्यूटिए हार्ड कोर्ट टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. वर्षातील शेवटच्या ग्रँडस्लॅम यूएस ओपन पुर्वी क्वीतोवाने या स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे सिध्द केले. बलाढ्य व संभाव्य विजेत्या वोज्नियाकीला सरळ दोन सेटमध्ये ७-५, ६-१ असे नमवून क्वीतोवाने बाजी मारली. दरम्यान पहिल्या सेटमध्ये ३-५ असे पिछाडीवर पडल्यानंतर क्वीतोवाने जबरदस्त पुनरागम करताना झुंजार खेळाचे प्रदर्शन केले.