किणी येथे हिम्मतबहाद्दूर पथक कबड्डी स्पर्धेला प्रारंभ
By Admin | Published: November 22, 2014 11:30 PM2014-11-22T23:30:01+5:302014-11-22T23:30:01+5:30
किणी : किणी (ता. हातकणंगले) येथील किणी विद्यार्थी मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या ६०व्या क्रीडा महोत्सवांतर्गत हिम्मतबहाद्दूर चव्हाण चषक कबड्डी स्पर्धेचा प्रारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
क णी : किणी (ता. हातकणंगले) येथील किणी विद्यार्थी मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या ६०व्या क्रीडा महोत्सवांतर्गत हिम्मतबहाद्दूर चव्हाण चषक कबड्डी स्पर्धेचा प्रारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.किणी विद्यार्थी मंडळाच्यावतीने व जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने हिम्मतबहाद्दूर चषक कबड्डी स्पर्धेत ७०हून अधिक संघांनी सहभाग नोंदविला. दिवस-रात्र प्रकाशझोतात सामने खेळविले जाणार आहेत.या स्पर्धेचे उद्घाटन महेंद्रसिंह चव्हाण (हिम्मतबहाद्दूर) यांच्या हस्ते व क्रीडांगणाचे पूजन विजयसिंह चव्हाण (हिम्मतबहाद्दूर) यांच्या हस्ते ध्वजारोहणाने करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच श्रीमती शशिकला पाटील होत्या. यावेळी वारणा बझारचे संचालक अनिल पाटील, किणी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सुहास माने यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते.यावेळी झालेल्या सामन्यात हिंदकेसरी (कवठेपिरान) साधना क्रीडा मंडळ (म्हालसवडे), कर्मवीर स्पोर्ट (कामेरी), प्रिन्स स्पोर्ट (लाटवडे), बळवंतराव यादव हायस्कूल (पेठवडगाव), किणी विद्यार्थी मंडळ (किणी), स्वराज्य स्पोर्ट (शिरोली), शिवगर्जना (कासेगाव), साधना क्रीडा मंडळ (कुरुंदवाड) या संघांनी उपउपांत्यफेरीत प्रवेश केला.या स्पर्धा राज्य पंच मंडळाचे सदस्य अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बी. एस. निकम, अर्जुन खांडेकर, रावसाहेब पाटील, कुबेर पाटील, अभिजित पाटणे, सुनील चौगुले, सुरेश खराडे, आदी पंच सामनाप्रमुख म्हणून काम पाहत आहेत.-----------फोटो मेलफोटेा ओळ :किणी येथील सामन्याचा एक क्षण