ज्युनिअर राज्य लगोरी स्पर्धांना प्रारंभ
By admin | Published: November 23, 2014 10:28 PM2014-11-23T22:28:16+5:302014-11-24T00:18:27+5:30
नाशिक, पुणे, सांगली, मुंबईची विजयी सलामी
नाशिक, पुणे, सांगली, मुंबईची विजयी सलामी
नाशिक : राज्य तसेच जिल्हा लगोरी संघटनेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ज्युनिअर लगोरी स्पर्धेस आजपासून प्रारंभ झाला़ नाशिक, सांगली, मंुबई, पुणे या संघांनी विजयी सलामी दिली़
पंचवटीतील मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर आमदार अपूर्व हिरे व उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धांना प्रारंभ झाला़ यावेळी राज्य संघात उत्कृष्ट खेळाडू वसंुधरा ठाकरे, नीरज तौवर व गुणित सुराणा यांचा सत्कार करण्यात आला़ या प्रसंगी निफाड अर्बन बँकेचे अध्यक्ष राजेंद्र राठी, अशोक सावंत, राज्य संघटनेचे सचिव संतोष गुरव, संजय पाटील, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष शैलेंद्र सोनजे, दत्तगिरी सावंत, दिनेश अहिरे आदि उपस्थित होते़
पहिल्या दिवशी मुलांच्या गटात नाशिकच्या संघाने सांगलीच्या संघाचा ११-७ व ५-३ च्या गुणफरकाने पराभव केला, तर मुंबई उपनगरकडून नाशिकला पुढच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला़ मुंबई शहर संघाने नाशिक ग्रामीण संघाचा पराभव केला़ सांगली संघाने पहिल्या फेरीत पुणे संघाचा पराभव केला, तर पुणे संघाने दुसर्या सामन्यात नवी मुंबईचा पराभव करत स्थान कायम ठेवले़
मुलींच्या गटात नवी मुंबईने रायगडचा पराभव केला़ सांगलीने अटीतटीच्या लढतीत पुणे संघाचा पराभव केला़ नाशिकच्या संघाने गांेदियाविरुद्ध एकहाती विजय मिळवला़ ठाणे संघाने रायगडचा पराभव केला, तर धुळे संघाने अहमदनगरचा पराभव करत विजयी सलामी दिली़
या स्पर्धेत मुलांच्या गटात २४, तर मुलींच्या गटात १२ संघांनी सहभाग घेतला आहे़ या स्पर्धेतील हरियाणा येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याच्या संघाची निवड करण्यात येणार आहे़