कोलकात्यात पावसाला सुरुवात, भारत - पाकिस्तान सामना रद्द होण्याची भीती
By admin | Published: March 19, 2016 05:24 PM2016-03-19T17:24:31+5:302016-03-19T17:25:28+5:30
कोलकात्यामध्ये पावसाला सुरुवात झाली असल्याने क्रिकेटरसिकांच्या उत्साहावर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे
Next
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १९ - कोलकात्यामध्ये पावसाला सुरुवात झाली असल्याने क्रिकेटरसिकांच्या उत्साहावर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे. ईडन गार्डनवर संध्याकाळी 7.30 वाजता भारत - पाकिस्तान टी-२० सामना सुरु होणार आहे. मात्र पाऊस सुरु असल्याने सामन्यासाठी उत्सुक असलेल्या क्रिकेट रसिकांचा पावसामुळे हिरमोड होण्याची शक्यता आहे. सकाळपासून सुरु असलेल्या पावसाच्या सरी अजून थांबलेल्या नाही आहेत.
सकाळपासूनच कोलकात्यातील वातावरण ढगाळ झाले असून अधुनमधून पावसाच्या सरीही कोसळत आहेत. दिवसभर हीच परिस्थिती कायम राहू शकते वा वीजांच्या कडकडाटासाह आणखी मुसळधार पाऊस पडू शकतो, अशी शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली होती. पाऊस न थांबवल्या सामना रद्द होण्याचं संकट आहे. तर दुसरीकडे कमी षटकांचा सामना खेळवला जाईल अशीही शक्यता आहे.
न्यूझीलंडकडून पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर वर्ल्ड कपमधील पहिल्या विजयासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. शनिवारी टी-२० विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यात कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. सर्वाधिक चर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा ‘हाय व्होल्टेज’ सामन्यात आयसीसी स्पर्धेत पाकविरुद्ध अजिंक्य राहण्याच्या विक्रमाची पुनरावृत्ती करण्यासह स्पर्धेतील आशा कायम राखण्याचेही भारतापुढे आव्हान असेल. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामनाच रद्द होतो की काय अशी भीती व्यक्त होत आहे.
It starts raining again in Kolkata #IndvsPak#WT20pic.twitter.com/O0WnEEJbef
— ANI (@ANI_news) March 19, 2016
The scene at Eden Gardens currently as the clouds overhead threaten rain ☔ Hopefully clearing up soon #INDvPAK#WT20pic.twitter.com/GFlidmOXro
— ICC (@ICC) March 19, 2016