राज्य ॲथ्लेटिक्स स्पर्धा

By admin | Published: August 28, 2015 11:37 PM2015-08-28T23:37:13+5:302015-08-28T23:37:13+5:30

पूनम, विकास, अभिजित, मृणालने गाजविला दिवस

State Athletics Tournament | राज्य ॲथ्लेटिक्स स्पर्धा

राज्य ॲथ्लेटिक्स स्पर्धा

Next
नम, विकास, अभिजित, मृणालने गाजविला दिवस
कनिष्ठ गट राज्य ॲथ्लेटिक्स स्पर्धेला प्रारंभ
नागपूर : नागपूर जिल्हा ॲथ्लेटिक्स संघटनेच्या यजमानपदाखाली रातुम नागपूर विद्यापीठ मैदानावरील ट्रॅकवर शुक्रवारी सुरू झालेल्या दोन दिवसांच्या कनिष्ठ गट राज्य ॲथ्लेटिक्स स्पर्धेत विविध गटात पूनम सोनुने, विकास पुनिया, अभिजित नायर, मृणाल धनवाडेने सुवर्णपदक जिंकून पहिला दिवस गाजविला. नागपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जयेंद्र गिरीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
स्पर्धेचे उद्घाटन महापौर प्रवीण दटके यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी राज्य ॲथ्लेटिक्स संघटनेचे सचिव व महासंघाचे उपाध्यक्ष प्रल्हाद सावंत होते. प्रमुख अतिथी म्हणून आ. सुधाकर देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, कॉमनवेल्थ स्पर्धेत १०० मीटर दौडीतील रौप्य विजेता रितेश आनंद, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त धावपटू चारुलता नायगावकर, आंतरराष्ट्रीय धावपटू अपर्णा भोयर, महाराष्ट्र राज्य ॲथ्लेटिक्स संघटनेचे कोषाध्यक्ष राजू पॅटी, मैत्री परिवाराचे नरेंद्र भुसारी, हिंगणघाट येथील प्रशांत मोहता, हमीद मस्कती, डॉ. पिनाक दंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ. कल्पना जाधव यांनी केले. डॉ. संजय चौधरी यांनी आभार मानले.
साक्षी कोहळे, रिद्धी चामट, गीता चाचेरकर, साक्षी आंबेकर, जयेंद्र गिरी यांनी क्रीडा ज्योत आणली. मान्यवरांनी मुख्य क्रीडा ज्योत प्रज्वलित करीत स्पर्धेचे उद्घाटन केले. प्रथमेश जोशी आणि रेवती कोरे यांनी शपथ दिली.
१६ वर्षे मुलींच्या गटात २००० मीटर दौड स्पर्धा नाशिकच्या पूनम सोनुने ७ मिनिटे ०४.८२ सेकंदात पूर्ण करीत जिंकली. सातारा येथील आकांक्षा शेलारला रौप्य व औरंगाबादच्या सोनीली पवारला कांस्य मिळाले. मुलांच्या गटात २००० मीटर दौडीत पुण्याचा विकास पुनिया याने बाजी मारली. त्याने ही स्पर्धा ६ मिनिटे १०.५८ सेकंदात पूर्ण केली. औरंगाबाद येथील गणेश हरगुडेने ही सहा मिनिटे १२.६८ सेकंदांसह रौप्य आणि परभणीच्या गणेश निरासने कांस्य घेतले.
१६ वर्षे गटात गोळाफेक प्रकारात पालघरच्या अभिजित नायरने सुवर्णपदक जिंकले. त्याने १५.७५ मीटर गोळाफेक केली. सोलापूरचा अरबाज अन्सार पठाण (१२.७७ मीटर) व औरंगाबादचा जीवन बोचरेने (१२.३६ मीटर) क्रमश: रौप्य व कांस्य जिंकले. याच गटात लांब उडीत मुंबई उपनगरच्या खेळाडूंनी सुवर्ण व रौप्य जिंकले.(क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: State Athletics Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.