राज्य कॅरम स्पर्धा : मोहम्मद गुफरान, काजल कुमारी यांना विजेतेपद 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 04:48 PM2019-03-12T16:48:13+5:302019-03-12T16:48:41+5:30

मुंबईचा दुसरा मानांकित मोहम्मद गुफरान, अग्रमानांकित काजल कुमारी यांनी महाराष्ट्र राज्य गुणांकन कॅरम स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला एकेरी गटाचे विजेतेपद पटकावले.

State Carrom Competition: Mohammed Gufran, Kajal Kumari won the title | राज्य कॅरम स्पर्धा : मोहम्मद गुफरान, काजल कुमारी यांना विजेतेपद 

राज्य कॅरम स्पर्धा : मोहम्मद गुफरान, काजल कुमारी यांना विजेतेपद 

googlenewsNext

मुंबई : मुंबईचा दुसरा मानांकित मोहम्मद गुफरान, अग्रमानांकित काजल कुमारी यांनी महाराष्ट्र राज्य गुणांकन कॅरम स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला एकेरी गटाचे विजेतेपद पटकावले. अंतीम फेरीत गुफरानने रंगतदार तीन गेम रंगलेल्या लढतीत बिनमानांकित ठाण्याच्या राजेश गोहिलचा २१-२५, २५-१४, २५-११ असा पराभव करून पहिल्या विजेतेपदाचा गवसणी घातली. महिला एकेरीमध्ये अग्रमानांकित कुमारीने दुसऱ्या मानांकित माजी सार्क व राज्य विजेती आयेशा मोहम्मदचा रोमहर्षक दोन गेम रंगलेल्या लढतीत २५-१३, २५-१५ असा फाडशा पाडत आपले वर्चस्व सिद्ध करून दुसऱ्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. 

पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीतील पहिल्या गेममध्ये अप्रतिम शाटॅस्‌ व आक्रमक खेळ करत ठाण्याच्या राजेश गोहिलने सातव्या बोर्डपर्यंत २२-२१ अशी आघाडी घेत आठव्या बोर्डमध्ये ३ गुण मिळवून २५-११ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये माजी जागतिक उपविजेता मोहम्मद गुफरानने शांत चित्ताने आक्रमक व बचावात्मक खेळाचे प्रदर्शन करत पाचव्या बोर्डपर्यंत २०-१४ अशी आघाडी घेत सातव्या बोर्डमध्ये ५ गुण मिळवून २५-१४ असा दुसरा गेम जिंकून १-१ ने बरोबरी केली. निर्णायक तिसऱ्या गेममध्ये आत्मविश्वास उंचावलेल्या मोहम्मद गुफरानने ५ व्या बोर्डपर्यंत १८-११ अशी आघाडी घेतली. नंतरच्या सहाव्या बोर्डमध्ये त्याच्या ब्रेकमध्ये कटशॉटसचे प्रात्यक्षिक घडवित ७ गुणांचा बोर्ड मिळवून २५-११ असा जिंकून आपल्या पहिल्या विजेतेपदावर नाव कोरले. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात मुंबईच्या संदिप दिवेने दोन गेम रंगलेल्या लढतीत मुंबईच्याच अमोल सावर्डेकरचा २५-१०, २५-८ अशी मात केली.

महिला एकेरीमध्ये तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात मुंबईच्या मिताली पिंपळेने दोन गेम रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत मुंबईच्याच निलम घोडकेची २५-२२, २५-१६ अशी कडवी झुंज मोडीत काढून रुपये ४,०००/-, चषक व प्रमाणपत्रावर समाधान मानावे लागले. 

तत्पूर्वी झालेल्या पुरुष गटाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ठाण्याच्या राजेश गोहिलने अटीतटीच्या तीन गेम रंगलेल्या लढतीत मुंबईच्या संदिप दिवेचा १५-२५, २५-८, २५-१६ असा पराभव करून कडवी झुंज मोडीत काढली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मोहम्मद गुफरानने अत्यंत आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत मुंबईच्याच अमोल सावर्डेकरला २५-३, २५-१० असे दोन गेममध्ये पराभूत करून अंतीम फेरी गाठली. महिला गटाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कुमारीने मुंबईच्याच मिताली पिंपळेवर दोन गेम रंगलेल्या लढतीत २५-१३, २५-० अशी मात करत अंतीम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईच्या माजी राज्य व सार्क विजेती आयेशा मोहम्मदने सातव्या मानांकित मुंबईच्या निलम घोडकेचा सरळ दोन गेम रंगलेल्या एकतर्फी लढतीत २५-५, २५-१६ असे नमवून अंतीम फेरी गाठली. 
 

 

Web Title: State Carrom Competition: Mohammed Gufran, Kajal Kumari won the title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.